Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२५-२६ च्या हंगामात केळीची लागवड केलेली नसताना सहभागी झालेल्या अपात्र केळी पीकविमाधारकांना विमा कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाकडून खुलासे मागविण्यासाठी मोबाईलवर संदेश (टेक्स्ट मॅसेज) दिले जाणार आहेत. .जिल्ह्यात सुमारे एक लाख तीन हजार हेक्टर क्षेत्रातील केळी पिकासंबंधी या हंगामात विमा संरक्षण घेण्यात आले. यात २८ हजार हेक्टर क्षेत्रात केळीची लागवड नसताना संबंधित शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतल्याचे कृषी विभाग व विमा कंपनीने एमआरसॅक प्रणालीतून पीक पाहणी, पडताळणी केल्यानंतर म्हटले आहे..Banana Crop Insurance: केळी उत्पादकांना ११ कोटींची विमा भरपाई मंजूर.तसेच १७ हजार हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे विमा संरक्षण फक्त चार ते पाच शेतकऱ्यांनी घेतले असून ही बाब संशयास्पद आहे. यातही २९ हजार विमाधारक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. सर्व मिळून ५५ हजार विमाधारक शेतकऱ्यांकडून खुलासे मागविले जाणार आहेत. हे खुलासे मागविण्यासाठी विमा कंपनीकडून कार्यवाही होईल. अनेक शेतकरी व्हॉट्सॲप वापरत नसल्याने सर्व अपात्र शेतकऱ्यांना मोबाईलवर टेक्स्ट मॅसेज पाठविला जाईल..Banana Crop Insurance Fraud: जळगावात केळी पीकविमा योजनेचा गैरवापर उघड.कृषी विभागाचे वरिष्ठ प्रतिसाद देईनातकृषी विभाग व विमा कंपनीने एमआरसॅकच्या मदतीने पडताळणी केली व अपात्र केळी विमाधारकांची माहिती तयार केली. यासंबंधी स्थानिक कृषी विभाग किंवा जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. अपात्र केळी पीकविमाधारकांची यादी कृषी विभागास प्राप्त होणार असल्याचेही काही दिवसांपूर्वी यंत्रणांनी सांगितले होते. पण ही यादी अजूनही या विभागाकडे आलेली नाही..अपात्र केळीविमाधारकांना मोबाईलवर मॅसेज देण्याची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. ही प्रक्रिया आमच्या मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयातर्फे राबविली जाईल. अपात्र केळी विमाधारकांची यादी अजून आमच्या कार्यालयाकडे प्राप्त झालेली नाही.- अमित पवार, जिल्हा समन्वयक, भारतीय कृषी विमा कंपनी, जळगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.