Market Bulletin: कापूस भाव स्थिरदेशात सीसीआयची कापूस खरेदी आजपासून बंद झाली आहे. आज शनिवार असल्याने बाजारातील आवकही कमी होती. त्यामुळे सीसीआयच्या खरेदी बंदचा बाजारावर फारसा परिणाम जाणवला नाही. त्यामुळे बहुतांशी बाजारांमध्ये कापसाचा भाव स्थिरावला होता. आज कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भावम मिळाला होता. सोमवारपासून कापसाची दैनंदीन आवक सुरळीत होईल. त्यावेळी याचा बाजारावर परिणाम दिसू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कांद्यावर दबावदेशातील बाजारात सध्या कांदा भावावर दबाव कायम आहे. बाजारातील कांदा आवक सुधारत आहे. रब्बीतील कांद्याची आवक अनेक भागात वाढली आहे. त्यातच उष्णताही वाढत आहे. वाढलेल्या उन्हामुळे कांद्यावरही परिणाम होत आहे. तसेच युध्दामुळे कांदा निर्यातीवरही परिणाम जाणवत आहे. यामुळे कांद्याचा भाव दबावात असून सध्या बाजारात ७०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान कांदा विकला जात आहे. देशातील मोठ्या बाजारांमध्ये कांद्याची आवक वाढलेली आहे. राज्यातील कांदा आवक आणखी सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याच्या भावावरील दबाव कायम राहील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Dry Fruit Price: नागपुरात सुकामेवा महागला.मका आवक स्थिरदेशातील बाजारात मक्याची आवक स्थिरावलेली आहे. सध्याची आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक आहे. खरिपातील वाढलेल्या उत्पादनामुळे यंदाची आवक सुरुवातीपासूनच अधिक राहीली आहे. तर रब्बी हंगामातही मक्याची लागवड वाढलेली आहे. यामुळे पुढील काळातही मक्याची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. सध्या मका देशातील बाजारात सरासरी १४०० ते १८०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. मक्याची आवक पुढील काळातही चांगली राहण्याची शक्यता आहे. तर मक्याला यंदा इथेनाॅलकडून कमी उठाव मिळालेली आहे. यामुळे मका भाव आणखी काही दिवस दबावातच राहू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Watermelon Price: खानदेशात कलिंगड दर घसरले.तूर स्थिरावलीदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीचा भाव स्थिरावला आहे. तुरीची आवक कमी झालेली आहे. तर यंदाही उत्पादन कमीच आहे. आयातही सध्या युध्दामुळे काहीशी प्रभावित झाली आहे. मात्र पुढील काळातही आयात होण्याची शक्यता कायम आहे. यामुळे तुरीचा भाव देशातील बाजारात स्थिरावला आहे. सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील आवक पुढील काळात काहिशी कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार तुरीच्या भावाला मिळेल, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..पपईला उठावराज्यातील बाजारात पपईला चांगलाच उठाव आहे. वाढत्या उष्णतेमुळे पपईला मागणी वाढत आहे. तर बाजारातील पपईची आवक सरासरीपेक्षा सध्या कमीच आहे. वाढत्या उन्हासोबत मागणी वाढत असल्याने सध्या पपईला प्रतिक्विंटल सराकरी १६०० ते २२०० रुपये भाव मिळत आहे. राज्यातील अनेक भागात सध्या पपईचा तोडा कमी होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच बदलत्या वातावरणाचा पपई पिकालाही फटका बसत आहे. पुढील काळातही पपईची बाजारातील आवक काहिशी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पपईचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.