Almatti Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Almatti Dam Water : ‘अलमट्टी’तून १० हजार क्युसेक विसर्ग

Dam Water Release : पाणलोट क्षेत्रात मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता असल्याने अलमट्टी धरणातून बुधवारी (ता. २९) सायंकाळी पाचपासून १० हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Team Agrowon

Sangli News : पाणलोट क्षेत्रात मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता असल्याने अलमट्टी धरणातून बुधवारी (ता. २९) सायंकाळी पाचपासून १० हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्यास हा विसर्ग वीस हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची माहिती अलमट्टी धरण प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने कृष्णा आणि वारणा नदीसह पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणात ४५.९५७ टीएमसी पाणीसाठा आहे. सध्या अलमट्टी धरणात ६० हजार ३७९ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.

कृष्णा नदीवरील कल्लोळ बंधारा, घटप्रभा नदीवरील लोलासूर पूल अलमट्टी धरणात पाण्याचा प्रवाह येत आहे. तसेच मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. अचानक पाणी सोडल्यास पूर परिस्थिती निर्माण होते.

त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दोन्ही विभागांशी संवाद सुरू केला असून संभाव्य पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आतापासून पाणी सोडण्याचे नियोजन केले असल्याचे सांगली पाटंबधारे विभागाने सांगितले.

पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कर्नाटकातील कल्लोळ बंधारा आणि घटप्रभा नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे धोका निर्माण होऊ नये यासाठी अलमट्टी धरण प्रशासनाने विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

अलमट्टी धरणातून १० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पावसाची आणि पाण्याचा आवक याची परिस्थिती पाहून विसर्ग वाढवला जाणार आहे. त्यामुळे अमलट्टी धरण क्षेत्रातील गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra ST Bus Service Issues: राजकारणासाठी एसटी प्रवासी वेठीला

MAGNET Projects Schemes: ‘मॅग्नेट’अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

Neem Research Centre: भिडीत कडुलिंब संशोधन केंद्र होणार

MSCB Profit: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ७०२ कोटींचा नफा

NABARD Experience Centre: मुंबईत नाबार्डच्या अनुभव केंद्राचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT