Almatti Dam Protest : सरकारने ठोस भूमिका न घेतल्यास थेट ‘अलमट्टी’वर धडक

Alamtti Dam Dispute : मुंबईतील बैठकीत ठोस निर्णय झाला नाही तर ‘अलमट्टी’वर जाऊन धडक देऊ, असा इशारा या वेळी देण्यात आला. भर उन्हाचा तडाखा असताना देखील दोन्ही जिल्‍ह्यांतील हजारो नागरिक रस्त्यावर बसून होते.
Almatti Dam Protest
Almatti Dam ProtestAgrowon
Published on
Updated on

Kolhapur/Sangli News : कोल्हापूर, सांगलीसह साताऱ्याला धोकादायक ठरणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात महाराष्ट्र सरकारने भूमिका ठोस न घेतल्यास थेट ‘अलमट्टी’वर धडक देऊ, असा इशारा अलमट्टी धरण उंची वाढविरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला.

रविवारी (ता. १८) समितीच्या वतीने कोल्हापूर-सांगली महामार्गावरील अंकली टोल नाका येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सहभाग घेऊन अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. सकाळी अकरापासून सुमारे दोन तास ‘चक्का जाम’ करण्यात आले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली.

Almatti Dam Protest
Almatti Dam : आलमट्टी धरणाच्या उंचीचा प्रस्ताव रद्द करा ; धनाजी चुडमुंगे ः नृसिंहवाडीत हरकत अभियानास प्रारंभ

अलमट्टी धरणाच्या उंची वाढीबाबत महाराष्ट्र जलसंपदा खात्याकडून २१ मे रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीला आमदारांसह सर्वपक्षीय अलमट्टी धरण कृती समितीला निमंत्रण नसल्याने सतेज पाटलांनी आक्रमक भूमिका घेत थेट रस्त्यावर ठिय्या मांडला.

या वेळी आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, गणपतराव पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, उल्हास पाटील यांच्यासह नेत्यांनी देखील रस्त्यावर ठाण मांडत, जोपर्यंत बैठकीसाठी लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रशासनाची चांगली धावपळ उडाली. त्यानंतर अखेर जलसंपदा विभागाकडून बैठकीचे लेखी निमंत्रण देण्यात आल्यानंतर हे चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले.

Almatti Dam Protest
Almatti Dam : अलमट्टी धरणाच्या उंचीवरून कर्नाटक सरकारची दुटप्पी भूमिका; महाराष्ट्राच्या तक्रारींबाबत केंद्रावर दबाव आणण्याचा प्रयत्न

मुंबईतील बैठकीत ठोस निर्णय झाला नाही तर ‘अलमट्टी’वर जाऊन धडक देऊ, असा इशारा या वेळी देण्यात आला. भर उन्हाचा तडाखा असताना देखील दोन्ही जिल्‍ह्यांतील हजारो नागरिक रस्त्यावर बसून होते. आमदार सतेज पाटील म्हणाले, की महाराष्ट्र शासनाने धरणाबाबतची आपली नेमकी भूमिका स्पष्‍ट करावी. न्यायायलीन लढाईत खरेच सरकार सहभागी आहे का, याचे खरे उत्तर मिळायला हवे.

विश्वजीत कदम म्हणाले, की वडनेरे समितीचा अहवाल चुकला आहे, हा अहवाल स्वीकारून गप्प बसलो तर कर्नाटक सरकार तोच अहवाल सादर करून अलमट्टी धरणाची उंची वाढवेल अशी भीती आहे. यामुळे या विरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, की हा प्रश्न गंभीर असल्याने कोणत्याही परिस्थितीत धरणाच्या उंची वाढीविरोधात केंद्र स्तरावरून लढून हा निर्णय हाणून पाडू. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचेही भाषण झाले. आमदार अरुण लाड, जयंत आसगावकर, प्रकाश आवाडे, सावकार मादनाईक, राजूबाबा आवळे, रजनी मगदूम आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com