Almatti Dam: अलमट्टीची उंची वाढविण्याला सर्वोच्च न्यायालयात विरोध करू

CM Devendra Fadnavis: कोल्हापूरातील इचलकरंजी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News: अलमट्टी धरण उंचीच्या विरोधात आपली लढाई सुरूच आहे. आपण त्यामध्ये कुठेही मागे हटणार नाही. आवश्यकता वाटल्यास याप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

इचलकरंजी येथील केएटीपी ग्राउंडवर शुक्रवारी (ता. २३) ७०० कोटींच्या विविध विकासकामांच्या उद्‌घाटन, लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाच्या अनुषंगाने भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या विकासपर्व सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडीक यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis: भूसंपादन प्रक्रिया दलाल लॉबीने हायजॅक केली

फडणवीस म्हणाले, की दरवर्षी महापुराची परिस्थिती या परिसरात निर्माण होते. सुमारे १५० टीएमसी पाणी समुद्राला वाहून जाते. या पाण्याचा योग्य वापर केल्यास अर्धा महाराष्ट्र पाणी पिऊ शकतो. ही बाब लक्षात आल्यानंतर जागतिक बँकेच्या माध्यमातून महापुराचे पाणी दुष्काळी भागात घेऊन जाण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. महापुराचे पाणी मराठवाड्यातील दुष्काळी भागात वळविले जाणार आहे.

या कामाची येत्या १५ दिवसांत निविदा काढली जाणार आहे. हा प्रकल्प झाल्यानंतर अलमट्टी धरणाची उंची वाढवली तरीही महापुराची समस्याच उद्‍भविणार नाही. एकीकडे महापुराचा प्रश्‍न तर दुसरीकडे इचलकरंजीच्या पाणी योजनेचे काय, असा सतत प्रश्‍न आमदार आवाडे हे प्रत्येक भेटीवेळी उपस्थित असतात.त्यावर लवकरच मार्ग काढला जाईल.

CM Devendra Fadnavis
Maharashtra Irrigation Projects: अठरा हजार कोटींच्या चार सिंचन प्रकल्पांना मान्यता

‘पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा आराखडा तयार’

पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्याचा आराखडा तयार आहे. त्यावरही काम सुरू असून सांडपाण्याचा एक थेंबही पंचगंगात जाणार नाही. सरकारचे प्राधान्य विकास कामांना आहे. त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एक नंबर करायचा आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

‘स्थानिक’च्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवा

सांगली : जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुका एकत्र किंवा चार-पाच दिवसांच्या फरकात होतील. निवडणुकांची तयारी करा, पूर्ण ताकदीने सगळ्या निवडणुका लढवायच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. निवडणुका जिंकल्या जातील त्या ठिकाणी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सांगली येथे शुक्रवारी (ता. २३) आयोजित भाजप मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी उच्च शिक्षणमंत्री पालक मंत्री चंद्रकात पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com