Akola Kharip Paisewari Agrowon
ॲग्रो विशेष

Kharip Paisewari : अकोला जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ५० च्या आत

Kharip Season : खरीप हंगामात पिकांना विविध टप्प्‍यांवर नुकसान सोसावे लागले. त्याचा परिणाम उत्पादकेवर झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० च्या आत आली आहे.

Team Agrowon

Akola News : खरीप हंगामात पिकांना विविध टप्प्‍यांवर नुकसान सोसावे लागले. त्याचा परिणाम उत्पादकेवर झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० च्या आत आली आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्याची ही पैसेवारी ४८ एवढी निघाली आहे.

खरीप पिकांबाबत सन २०२३-२४ साठी तहसील कार्यालयांनी सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार १२ गावांपैकी ९९० गावांची पैसेवारी काढण्यात आली असून, ती ४८ पैसे इतकी आहे.

अकोला तालुक्यातील १८१ गावे, अकोट तालुका १८५, तेल्हारा तालुका १०६, बाळापूर १०३, पातूर ९४ गावांची ही पैसेवारी काढण्यात आली. ती ४८ पैसे एवढी आलेली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील १६४ गावांची पैसेवारी ४६ पैसे आहे. तर बार्शीटाकळी तालुक्यातील १५७ गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे एवढी निघाली आहे.

उत्पादकता घटल्यावर शिक्कामोर्तब

यंदाच्या खरीप हंगामात पावसाला उशिरा सुरुवात झाली. त्यामुळे पेरण्या लांबल्या. ऑगस्ट महिन्यात २० दिवसांपेक्षा अधिक कालावधीचा खंड पडला. नंतर सलग पाऊस झाला. अशा विचित्र परिस्थितीला यंदा खरीप पिकांना जावे लागले.

यामुळे हंगामातील सोयाबीन या प्रमुख पिकाचे मोठे नुकसान झाले. फुलोऱ्यात खंड सोसावा लागल्याने उत्पादकता क्विंटल-दोन क्विंटलपर्यंत होती. काहींना गेल्यावर्षी ८ ते १० क्विंटलदरम्यान उत्पादन झाले असताना यंदा अर्धेही उत्पादन होऊ शकलेले नाही. शिवाय कपाशीच्या पिकाचेही असेच नुकसान झालेले आहे.

कपाशीचे बागायती क्षेत्रातील उत्पादन पाच ते ८ क्विंटलदरम्यान राहिलेले आहे. कोरडवाहू पट्ट्यातील कपाशीचे उत्पादन यातुलनेत कमी येत आहे. परिणामी सोयाबीन, कापूस उत्पादकांना नुकसान झेलावे लागले. मूग, उडदाच्या पिकाची, तर उत्पादकता क्विंटलच्या आत राहिलेली होती. थोड्या प्रमाणात ज्वारीच्या पिकाने शेतकऱ्यांना सावरले. परंतु हे लागवड क्षेत्र कमी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT