Kharip Paisewari : हिंगोली जिल्ह्यातील ७०७ गावांची खरिपाची अंतिम पैसेवारी ४८.०७

Kharip Season : हिंगोली जिल्हा प्रशासनाने यंदाच्या (२०२३) खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी शुक्रवारी (ता.१५) जाहीर केली आहे. जिल्ह्यातील ७०७ गावांची खरिपाची अंतिम पैसेवारी सरासरी ४८.०७ आली आहे.
Kharip Paisewari
Kharip PaisewariAgrowon
Published on
Updated on

Hingoli News : जिल्हा प्रशासनाने यंदाच्या (२०२३) खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी शुक्रवारी (ता.१५) जाहीर केली आहे. जिल्ह्यातील ७०७ गावांची खरिपाची अंतिम पैसेवारी सरासरी ४८.०७ आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील पैसेवारी लागू असलेल्या सर्व ७०७ गावांतील लागवडीयोग्य क्षेत्र ४ लाख १८ हजार २५२ हेक्टर आहे. या गावातील यंदाचे (२०२३) पेरणीक्षेत्र ३ लाख ८२ हजार ६०९ हेक्टरवर होते. तर एकूण पडीक क्षेत्र ३५ हजार ६७७ हेक्टर आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी (ता.१५) जिल्ह्याची यंदाच्या खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर केली.

Kharip Paisewari
Drought Condition Marathwada : मराठवाड्यात खरिपाची सुधारित आणेवारी जाहीर, अंतिम पैसेवारी ५० पैश्यांच्या आत

खरीप पिकांची अंतिम हंगामी पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्यामुळे ७०७ गावांमध्ये दुष्काळग्रस्तांच्या सवलती लागू होतील. त्यात जमिनीत महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी,

Kharip Paisewari
Kharif Paiswari : हिंगोली जिल्ह्याची खरिपाची हंगामी पैसेवारी सरासरी ५९.६२

तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गंत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या वीज जोडणी खंडित न करणे या सवलतीचा समावेश आहे.

तालुकानिहाय खरीप २०२३ अंतिम पैसेवारी (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका गावांची संख्या पेरणी क्षेत्र पैसेवारी

हिंगोली १५२ ८०४९२ ४९.२५

कळमनुरी १४८ ७२४७० ४४.८९

वसमत १५२ ७८८०३ ४९.००

औंढा नागनाथ १२२ ५९९१८ ४७.७०

सेनगाव १३३ ९०९२६ ४९.५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com