Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपीट

Team Agrowon

Akola News : उन्हाचा चटका वाढत असताना दुसरीकडे अवकाळीसुद्धा धुमाकूळ घालत आहे. मंगळवारी (ता.२३) पश्‍चिम विदर्भात अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत काही भागात जोरदार अवकाळी पाऊस झाला. प्रामुख्याने अकोट, खामगाव, शेगाव तालुक्यांत जोरदार पावसासह गारपीट झाली. त्यामुळे पुन्हा पिकांचे नुकसान झाले.

या महिन्यात दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस (Rain) झाला. मंगळवारी अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात सोनेवाडी भागात जोरदार पाऊस व गारपीट झाली. ताजनापूर भागात विधाता पोल्ट्रीफार्ममधील जवळपास ७५० कोंबड्या दगावल्याचे समजते. यात शेतकऱ्याचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.

या भागात भाजीपाल्यासह, ज्वारी, मका, भुईमूग, गहू, कांदा आदी पिकांचेही नुकसान झाले. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. बार्शीटाकळी तालुक्यातही पावसाने धुमाकूळ घातला. अकोला व शहर परिसरांत हलक्या सरी झाल्या.

बुलडाणा जिल्ह्यात शेगाव, खामगाव तालुक्यांत वादळी पाऊस झाला. गारपीटही झाली. झाडे व विद्युत खांब उखडले गेले. शेगाव शहर परिसरात दुपारी ३ वाजेदरम्यान मुसळधार पाऊस झाला.

त्यामुळे मका, ज्वारी, कांदा, पपई, केळी पिकांचे नुकसान झाले. लोखंडा, पाळा, शिराळा, गणेशपूर, किन्ही महादेव, जळकातेली, ढोरपगाव, काळेगाव शिवारात वादळामुळे फळबागांचे नुकसान झाले. शिरपूर येथे वीज पडून बापूराव हिवाळे (वय ७०) यांचा मृत्यू झाला. मेरा बुद्रूक परिसरात गारांचा पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT