Crop Damage : मराठवाड्यात ६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Unseasonal Rain : मराठवाड्यात ९ ते १४ एप्रिल या पाच दिवसात मराठवाड्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच आहे. शनिवारी (ता. २०) सोसाट्याच्या वाऱ्यासोबत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका ११४ गावांतील ३ हजार २२३ शेतकऱ्यांना बसला असून विभागातील १ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायत आणि फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे आता नुकसानीचे अंदाजित क्षेत्र ६ हजार २५७ हेक्टरवर पोहोचल्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यात ९ ते १४ एप्रिल या पाच दिवसात मराठवाड्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या पाच दिवसांच्या आवकाळीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची दाणादाण उडाली. वीज पाडून १० जण जखमी झाले तर १० जणांचा मृत्यू झाला होता. लहान, मोठे, ओढकाम करणारे असे एकूण १५२ पशूधन दगावले होते.

Crop Damage
Crop Damage : केळी बागांचे ४० हजार हेक्टर क्षेत्र होरपळले

अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २३७ हेक्टर, जालना ९९०, परभणी ५३९, हिंगोली ३३०, नांदेड ८२०, बीड १६९३, लातूर ३२४, धाराशिव जिल्ह्यात ३२१ हेक्टर बागायती, जिरायती व फळपिकांचे नुकसान झाले होते. अवकाळीचा कहर सुरूच असून शनिवारी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. याचा फटका ११४ गावांतील ३ हजार २०० शेतकऱ्यांना बसला.

Crop Damage
Crop Damage : नाशिकमध्ये अवकाळीचा ७२९ हेक्टरला फटका

त्यांचे जवळपास १ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे ९ एप्रिलपासून २० एप्रिलपर्यंत वीज पडून १४ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत. लहानमोठी २७३ जनावरे दगावली आहेत. तर ५४४ घरांची पडझड झाली आहे. मराठवाड्यातील एकूण ५९५ गावे बाधित झाली असून १२ हजार ३५० शेतकऱ्यांचे एकूण ६ हजार २५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्हाला बसला आहे. महसूल प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.

९ ते २० एप्रिलपर्यंत झालेले नुकसान, बाधित गावे व शेतकरी

जिल्हा बाधित गावे बाधित शेतकरी नुकसान हे.

छ.संभाजीनगर १२ ४४० २३७

जालना १३३ १७३८ ९९०.३

परभणी ३१ ५५६ ३२८.११

हिंगोली २४ २९४४ ८७५.४

नांदेड ३९ ११०० ८४०.१

बीड १३८ ३९९६ १८७३

लातूर १६२ ११०२ ६८८.६५

धाराशिव ५६ ४७४ ४२४.४

एकूण ५९५ १२३५० ६२५७.९१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com