NCP Ajit Pawar Group Leader Ramkrishna Bangar Arrested Agrowon
ॲग्रो विशेष

NCP Ajit Pawar Group : बीडमध्ये अजित पवार गटाची चिंता वाढली?; पाटोदा बाजार समिती घोटाळा प्रकरणात बांगर यांना अटक

NCP Leader Ramkrishna Bangar Arrested : राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीला रंग चढत असतानाच बीडमध्ये दुसरीकडे अजित पवार गटाच्या समस्या वाढल्या आहेत. येथे राष्ट्रवादीच्या एका नेत्याची अटक झाली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Beed/Pune News : पाटोदा बाजार समितीतील घोटाळा प्रकरणी एनसीपीचे नेते रामकृष्ण बांगर यांना पोलिसांनी रविवारी (ता. २७) अटक केली. १५ दिवसांपूर्वी बांगर यांच्या विरोधात पाटोदा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. तर घोटाळा प्रकरणी बांगर यांना वाशिम येथून अटक करण्यात आली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीवरून रंग चढत असून सर्वच राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. अजित पवार गटाने देखील रविवारी (ता.२७) आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. एकीकडे उमेदवार जाहीर करत असतानाच बीडमध्ये मात्र पक्षाची चिंता वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बांगर यांनी बाजार समितीचा भूखंड परस्पर दुसऱ्याला विकला. तसेच बांगर यांनी महात्मा फुले अर्बन बँकेच्या माध्यमातून १४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची तक्रार पाटोदा पोलीसांत देण्यात आली होती. याप्रकरणी बांगर यांना अटक झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बांगर यांनी बाजार समितीचा भूखंड परस्पर दुसऱ्याला विकला. तसेच या व्यवहारात महात्मा फुले अर्बन बँकेच्या माध्यमातून १४ कोटी रुपयांचा घोटाळा केला. यानंतर पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली होती.

तर पोलिसांनी १५ दिवसांपूर्वी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता. या प्रकरणी बांगर यांच्यासह पोलिसांनी तब्बल ४१ जणांवर गुन्हा दाखल केला. तपास सुरू केल्यापासून बांगर फरार होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी भरारी फथकांची निर्मिती करून शोध सुरू केला होता. तपासादरम्यान पथकाने वाशीम येथील एका हॉटेलमधून बांगर यांना रविवारी ताब्यात घेतले. सध्या ते पाटोदा पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस त्यांची चौकशी आणि पुढील तपास करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT