NCP ajit pawar Candidate : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही तिसरी यादी आली समोर! तिसऱ्या यादीत फक्त चौघांचा समावेश

Maharashtra Assembly Election 2024 : शनिवारी (ता. २६) भाजपसह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यानंतर अजित पवार आपल्या उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार आणि कोणाला संधी देणार याकडे अख्या राज्याचे लक्ष लागले होते.
NCP ajit pawar Candidate
NCP ajit pawar CandidateAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची सुरूवात देखील झाली आहे. यादरम्यान भाजपसह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपली तिसरी यादी रविवारी (ता.२७) जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तिसरी यादी जाहीर केली. ज्यात फक्त ४ उमेदवारांनी विधानसभेची संधी देण्यात आली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर आज जाहीर केली. या यादीत एकूण चार जणांची नावांची घोषणा करण्यात आली असून गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडित यांना संधी देण्यात आली आहे. सचिन पाटील यांनी फलटण, निफाडमधून पुन्हा एकदा दिलीपकाका बनकर आणि काशिनाथ दाते यांना पारनेर मतदार संघातून विधानसभेच्या मैदानात उतरवण्यात आले आहे.

NCP ajit pawar Candidate
Maharashtra Assembly Election : काँग्रेसने जाहीर केली दुसरी यादी; २३ जागांवर कोणाला लॉट्री?

लोकसभेला अजित पवार यांनी निलेश लंकेंच्याविरोधात दंड थोपाटूनही लंके विजयी झाले होते. आता विधानसभेला शरद पवार गटाने त्यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार गटाने राणी लंके यांचा पाडाव करण्यासाठी काशिनाथ दाते यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे इतर मतदारसंघाप्रमाणेच येथे देखील थेट लढत राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी अशी होणार हे नक्की झाले आहे.

NCP ajit pawar Candidate
Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

दरम्यान काँग्रेसने देखील तिसरी यादी शनिवारी (ता.२६) जाहीर केली. या तिसऱ्या यादीत १६ जणांना संधी देण्यात आली असून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र ते या मतदारसंघातून लढण्यास उच्छुक नसून मतदारसंघ बदलून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काँग्रसचे उमेदवार

राणा सानंदा (खामगाव), हेमंत चिमोटे (मेळघाट), मनोहर पोरेटी (गडचिरोली), माणिकराव ठाकरे (दिग्रस), मनोहर अंबाडे (नांदेड दक्षिण) निवृत्तीराव कांबळे (देगलूर) हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर (मुखेड), शिरीष कुमार कोतवाल (चांदवड), लकीभाऊ जाधव (इगतपुरी), एजाज बेग (मालेगाव मध्य), दयानंद चोरघे (भिवंडी पश्चिम), सचिन सावंत (अंधेरी पश्चिम), असिफ झकारीया (वांद्रे पश्चिम), कुलदीप पाटील (तुळजापूर) अशी उमेदवारी देण्यात आली आहे. तर सांगलीतून पृथ्वीराज पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली असून कोल्हापूर उत्तर मतदारमंघातून राजेश लाटकर यांना रिंगणात उतरण्यात आले आहे. त्यामुळे येथे दोन राजेश यांच्यात यंदा कडवी झुंझ पाहायला मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com