Vanarai Bunds  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Bunds : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा ६ हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट

Water Shortage : जिल्ह्यात या वर्षी पावसाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहीले. आतादेखील नद्या-नाल्यांची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच पावले उचलली जात आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन सुरू केले असून यावर्षी ६ हजार २०० बंधारे बाधण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

जिल्ह्यात या वर्षी पावसाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहीले. आतादेखील नद्या-नाल्यांची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच पावले उचलली जात आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने या वर्षी जिल्ह्यातील नदी, नाल्यांवर ६ हजार २०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील आठही तालुक्यांना उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. कणकवली, कुडाळ, मालवण आणि सांवतवाडी तालुक्यांना प्रत्येक एक हजार तर वेंगुर्ले तालुक्याला पाचशे आणि वैभववाडी आणि दोडामार्ग तालुक्याला प्रत्येकी ४०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. याशिवाय देवगड तालुक्याला ९०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे बंधारे नोव्हेंबरपासून बांधण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

भातकापणीचा हंगाम संपताच कच्चे आणि वनराई बंधारे बांधण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांनी संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.
- संतोष सावर्डेकर, जलसंधारण अधिकारी, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT