Water Bunds : रत्नागिरीत श्रमदानातून २ हजार वनराई बंधारे

गावातून वाहणारे नाले, वहाळ आणि उपनद्या यावर तात्पुरते बंधारे बांधून त्या पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे. श्रमदानातून हे बंधारे उभारले जात आहेत.
Water Conservation
Water ConservationAgrowon

रत्नागिरी ः ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ (Pani Aadva Pani Jeerva) या संकल्पनेतून जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत दरवर्षी बंधारे (Bandhara) उभारले जातात. यंदाही श्रमदानातून २ हजार ३२७ बंधारे बांधण्यात (Water Conservation) आले असून त्यामध्ये साधारणपणे ७० कोटी लिटर पाणी साठले आहे.

गावातून वाहणारे नाले, वहाळ आणि उपनद्या यावर तात्पुरते बंधारे बांधून त्या पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे. श्रमदानातून हे बंधारे उभारले जात आहेत.

सात वर्षांपूर्वी ही मोहीम सुरू करण्यात आली होती. पहिल्या वर्षी दहा हजार बंधाऱ्यांचे लक्ष ठेवले होते. त्यापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक बंधारे उभारण्यात यश आले.

कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या विजय बंधाऱ्यांचे मॉडेल पाणी साठवून ठेवण्यासाठी अधिक उपयुक्त असल्याचे दिसून आले.

सिमेंटच्या पोत्यांचा उपयोग करून हे बंधारे उभारले जातात. यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत मोसमी पाऊस सुरू होता. त्यामुळे गावागावातून वाहणारे नदी, नाल्यांचे प्रवाह वेगवान होते.

परिणाम प्रत्यक्ष बंधारे बांधण्यासाठी उशीर झाला. फेब्रुवारी महिना आला तरीही अनेक ग्रामस्थ अजूनही श्रमदानातून बंधारे उभारत आहेत.

प्रत्येक गावाला दहाचे लक्ष्य दिले होते; परंतु गावानिहाय प्रत्येकी तीन ते चार बंधारे उभारण्यात येत आहेत. काही वाड्या कमी लोकसंख्येच्या असल्याने तेथे श्रमदानासाठी लोकांचा प्रतिसाद मिळत नाहीत.

Water Conservation
Water Conservation : लोकसहभागातून बांधले २८८ वनराई बंधारे

बंधाऱ्यांतील पाण्याचा उपयोग सिंचनासाठी, कपडे धुणे, गाई-गुरांसाठी केला जातो. तसेच बंधारा बांधल्यानंतर अडलेले पाणी जमिनीत जिरते आणि किनाऱ्यावरील विहिरींची पाणी पातळीही वाढण्यास मदत होते.

एप्रिल, मे महिन्यात कडाक्याच्या उन्हाळ्यात पाणी पातळी कमी होते. काही ठिकाणी विहिरी पूर्णतः कोरड्या पडतात. त्या वेळी पाण्याचा प्रश्‍न निर्माण होतो.

बंधाऱ्यातील पाण्यामुळे अनेक विहिरींचे पाणी उशिरापर्यंत वापरण्यास मिळत आहे. काही गावांमध्ये कच्चे बंधारे विहिरींची पाणी पातळी वाढविण्याच्या उद्देशानेच उभारले जातात.

गेल्या दोन वर्षांत गावागावात पाणी योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

तालुकानिहाय बांधण्यात आलेले बंधारे

तालुका बंधारे

मंडणगड - १०३

दापोली - ५०६

खेड - १०५

चिपळूण - ३०१

गुहागर - २५७

संगमेश्वर - ३२५

रत्नागिरी - २५४

लांजा - २३९

राजापूर - २३७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com