Pune News : खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील डॉल्फिन टेकडीवर वनपरिमंडल धामणी वन विभाग व खडकवाडी ग्रामस्थांचा लोकसहभाग व श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची वनराई बंधारा ही महत्त्वाकांक्षी योजना असून योजनेमध्ये पावसाचे पडणारे पाणी व वाहून जाणारे पाणी हे वनक्षेत्रात या वनराई बंधाऱ्यामुळे अडवले जाणार आहे.
अशा प्रकारे प्रत्येक वनक्षेत्रात बंधारे बांधले तर सध्याच्या दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीतील पाण्याची पातळी सुधारण्यास वाढण्यास मदत होणार आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
असे सांगत मंचर वनपरिक्षेत्रामध्ये एकूण ७० बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती मंचर विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी दिली. खडकवाडी डॉल्फिन टेकडीवर वनराई बंधारा बांधण्यात यामध्ये येथील ग्रामस्थांनी सहभागी होत श्रमदान केले.
यामध्ये वनपाल धामणी सोनल भालेराव, वनरक्षक धामणी पूजा पवार, वनसेवक दिलीप वाघ, रेस्क्यू टीम मेंबर कल्पेश बढेकर, सोन्याबापू लंके, गोरक्षनाथ सिनलकर, विनोद तांबे, झाडकरी ग्रुप, आदेश भागवत, महेश सुक्रे यांनीही सहभाग घेतला. श्रीराज भालेराव, स्वरा भालेराव, देवांश भालेराव, देवांश भागवत या मुलांनीही बंधारा पूर्ण करण्यात सहभाग घेतला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.