AI Sugarcane Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture AI technology : एआय ऊस शेतीत क्रांती करेल ः हर्षवर्धन पाटील

AI Sugarcane Farming : ऊस शेतीमधील कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पाणी व खतांची बचत होऊन सुमारे ४० टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढ तसेच साखर उतारा वाढ होत असल्याचे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.

Team Agrowon

Pune News : ऊस शेतीमधील कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पाणी व खतांची बचत होऊन सुमारे ४० टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढ तसेच साखर उतारा वाढ होत असल्याचे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. त्यामुळे ऊस शेती क्षेत्रात ‘एआय’ क्रांतिकारक ठरेल, असा विश्‍वास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना यांच्या संचालक शेतकरी व अधिकारी यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रास भेट देऊन मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठ व बारामती ॲग्रीकल्चर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेल्या ऊस शेतीची माहिती घेतली.

या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी या संदर्भातील तंत्रज्ञानाची उपग्रहाद्वारे घेण्यात येणाऱ्या नोंदीच्या वॉररूमला भेट देऊन या ‘एआय’चा वापर करणाऱ्या राज्यातील काही शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीलेश नलवडे यांनी ‘एआय’ पद्धतीने केलेल्या ऊस शेतीची माहिती देताना ऊस शेतीमधील क्रांतिकारक बदल शेतकऱ्यांनी स्वीकारायला हवा.

शेतकऱ्यांच्या मोबाइलवर मराठी भाषेत हे तंत्रज्ञान पोहोचविले जात आहे. या पद्धतीने उसाचे एकरी १५० टन एवढे उत्पादन घेतले असून, आता एकरी २०० टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचेही सांगितले.

तर कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विवेक भोईटे, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे तुषार जाधव, धीरज शिंदे आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी नीरा-भीमा कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार व दोन्ही कारखान्याचे संचालक मंडळ, शेतकी विभागाचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

‘एआय’ तंत्रज्ञान वापरून उसाचे पीक घेतल्याने कृषी विज्ञान केंद्राचे नाव जगात सर्वदूर पोहोचले आहे. आता शेतकऱ्यांना ऊस शेती ही ‘एआय’ तंत्रज्ञानाने करावीच लागेल, त्याशिवाय शेतकरी तग धरू शकणार नाहीत. या तंत्रज्ञानामुळे कमी उत्पादन खर्चात, ऊस उत्पादनात मोठी वाढ होऊन क्रांती घडणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agristack Registration: छत्रपती संभाजीनगरमध्ये सव्वा लाखाहून अधिक शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी प्रलंबित

Book Review: प्रादेशिक सिनेमांचा आस्वादक धांडोळा

Shades of History: इतिहासातील करडी छटा

Interview with Ashish Thackeray: बिगरजंगली बिबट्यांमुळेच संघर्ष वाढतोय

Ashtamudi Lake: एका कवितेची सत्तरी

SCROLL FOR NEXT