Agriculture AI  Agrowon
ॲग्रो विशेष

AI In Agriculture : ‘एआय’तंत्रज्ञानामुळे उत्पादनवाढ शक्य ः पवार

Agriculture Technology : एआय तंत्रज्ञानामुळे जमिनीमधील वाफसा, पिकांना लागणारे अन्नद्रव्ये, पाण्याचे प्रमाण, हवामान या विषयीची संपूर्ण माहिती सॅटेलाईटद्वारे मोबाईल वर मिळते,

Team Agrowon

Solapur News : एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अवलंब केल्यास कमी खर्चात जास्त उत्पादन शक्य आहे, असे मत बारामती अॅग्रिकल्चर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी बेंबळे (ता. माढा) येथे व्यक्त केले.

बेंबळेतील शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी सोमनाथ हुलगे यांच्या शेतावर निर्यातक्षम केळी उत्पादक शेतकरी ग्रुप व ऊस उद्दिष्ट शंभर प्लस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शिवार फेरीचे आयोजन केले होते.

त्यावेळी ते बोलत होते. केळी निर्यातदार किरण डोके, जैन इरिगेशनचे किरण पाटील, ऊस विकास अधिकारी प्रवीण भापकर, दत्तात्रय कवडे, प्रगतिशील शेतकरी एम. के. देशमुख, अरुण गाडे, अंगद पाटील, रघुनाथ कदम, संतोष शिंदे, मोहन भोसले, वाय. जी. भोसले सर, बंकट काळे, सज्जन आवताडे, नवनाथ लोहार उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की एआय तंत्रज्ञानामुळे जमिनीमधील वाफसा, पिकांना लागणारे अन्नद्रव्ये, पाण्याचे प्रमाण, हवामान या विषयीची संपूर्ण माहिती सॅटेलाईटद्वारे मोबाईल वर मिळते, त्यामुळे पिकांचे अचूक व्यवस्थापन होण्यास मदत होते,

परिणामी कमी खर्चात जास्त उत्पादन निघते, असे सांगितले. श्री. पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सोमनाथ हुलगे यांनी ते स्वतः घेत असलेले केळी उत्पादन आणि त्याची उत्पादकता कशी वाढवली, याची माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT