Ai in Agriculture: आमच्यासोबत तुम्हीही तंत्रज्ञानाची कास धरा...

Baramati Smart Agriculture: शेतीत आता केवळ मेहनत नाही, तर तंत्रज्ञानाची साथ हवी. बारामतीच्या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून शेतकरी कमी खर्चात अधिक उत्पादन आणि उत्पन्न मिळवू शकतात.
Ai Agriculture
Ai AgricultureAgrowon
Published on
Updated on

Pune News: बदलत्या काळात लहरी हवामानाचा फटका सहन करण्यापेक्षा तंत्रज्ञानाची मदत घेऊन कमी खर्चात अधिक उत्पादन व उत्पन्न देणारी शेती करणे सहज शक्य आहे. आम्ही ही कास धरली आहे, तुम्हीही आमच्यासोबत या मोहिमेमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी केले आहे.

बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संयुक्त प्रयत्नातून शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रत्यक्ष शिवारात यशस्वी ठरला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीत या तंत्रज्ञानाने आमूलाग्र बदल केला आहे.

या तंत्रज्ञानावर आधारित शेती पद्धतीचा अवलंब करण्यासाठी राज्य सरकार, साखर कारखान्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच सहकारी बँकांनीही यात मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच बरोबरच आता शेतकऱ्यांनी स्वतः या तंत्रज्ञानाचा वापर तातडीने सुरू करायला हवा, असे प्रगतिशील शेतकरीच आता सांगू लागले आहेत. सहकारी साखर कारखानदारी शेतकऱ्यांच्याच सामूहिक प्रयत्नातून उभी राहिली आहे, आता नवतंत्रज्ञानाच्या वापरासाठीही शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.

Ai Agriculture
Ai in Farming: प्रमुख पिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र वापरावे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आष्टा येथील संजीव माने (९४०४३६७५१८) यांनी एआय तंत्रज्ञानाचा अवलंब त्यांच्या शेतात केला आहे. ते म्हणाले, ‘‘मी पहिल्या दिवसापासून या प्रयोगाचा साक्षीदार आहे. कमी पाणी वापर, संतुलित काटेकोर अन्नद्रव्यांच्या वापरातून जमिनीची सुपीकता टिकवून कमी दिवसांत आणि कमी खर्चात अपेक्षित उत्पादन मिळवणे या एआय तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. केव्हीके बारामतीकडून आम्हाला शास्त्रीय मार्गदर्शन करणारे संदेश मोबाइलवर येतात. त्यानुसार फक्त कार्यवाही करायची असते.

पाण्याची उत्तम बचत झालीच पण रोग-किडींच्या प्रादुर्भावाबाबत पूर्वसूचना देखील आम्हाला समजू लागली आहे. उपाययोजनाही लगेचच हजर होत्या. उपग्रहाच्या माध्यमातून परिपूर्ण माहिती मोबाइलवर सतत येत राहते. त्यामुळे सातत्याने व्यवस्थापन बदल, सुधारणा करता येतात. कारखाना, बँका किंवा सरकार आपल्यापरीने या प्रकल्पात सहकार्य करेलच. पण त्यासोबतच शेतकऱ्यांनी आता हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.``

Ai Agriculture
AI In Agriculture : शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीबरोबरच शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्राधान्याने करावा

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथील आदित्य यशवंत भगत (९८६०६१२२९९) म्हणाले, ‘‘या तंत्रामुळे उसाच्या शेतीत पाण्याची किमान ४५ टक्के बचत झाली. हवामानाचा अचूक अंदाज मिळतो. रोग-किडीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होते. सॉइल सेन्सरमुळे योग्य खते ड्रीपद्वारे पिकांना देता येतात. उपग्रहाच्या मदतीने पाणी, खत मात्रा किती हवी याचा अचूक अंदाज येतो. उसाचे उत्पादन चाळीस टक्क्यांहून अधिक वाढेल, यात शंका नाही. माझ्याही उत्पन्नात वाढ होईल. बदलते तंत्रज्ञान प्रत्येकाने वापरायला हवे. शेतकऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.

सर्वांचा सहभाग हवा

आजमितीस उसासोबतच भात, द्राक्ष व डाळिंब या पिकांमध्येही एआय तंत्रज्ञान वापरून कमी खर्चात अधिक उत्पादन व उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट करत आहे. दीड हजारांवर शेतकरी यात प्रत्यक्ष सहभागी असून, त्यांच्या शिवारात हे प्रयोग यशस्वी झाले आहेत. शेतकऱ्यांकडूनच आता नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व्हायला हवा हा संदेश इतर शेतकऱ्यांना दिला जात आहे, ही बाब महत्त्वाची आहे.

जमीन मालकांनी एकत्र यायला हवे

परदेशाशी तुलना करता आता अत्यंत माफक खर्चात हे तंत्रज्ञान आपल्या शेतात बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राने उपलब्ध करून दिले आहे. चोवीस महिन्यांच्या पीक पद्धतीने जादाची दोन पिके घेता येतील. हार्डवेअरचा खर्च एकदाच असेल व तो पाच वर्षांसाठी असेल, तर इतर खर्च दरवर्षी एकरी चार ते पाच हजार रुपये असेल. खत व पाणी बचत, उत्पादन वाढ, वाढलेले उत्पन्न याचा विचार करता एक वर्षात केलेली गुंतवणूक सहज भरून निघते.

गुंतवणूक कमी व मिळणारा फायदा अधिक असे याचे गणित आहे. जमीनमालक शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी एकूण शंभर एकरावर ही पीकपद्धती राबवली तर ती अधिक प्रभावी ठरेल. या बाबत अधिक माहितीसाठी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या तज्ज्ञांशी या क्रमांकावर संपर्क साधावा- डॉ. विवेक भोईटे- ७७२००८९१७७ तुषार जाधव- ९३०९२४५६४६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com