Nano Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Nano Fertilizer : नॅनो खताप्रमाणे कृषी क्षेत्रात नावीन्यता आणण्यासाठी प्रयत्नांची गरज

AI In Farming : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ऊस शेतीमध्ये होतो आहे. खतांचा व पाण्याचा वापर कमी होऊन खर्च वाचवत उत्पादन वाढले असल्याचे संशोधन झाले आहे.

Team Agrowon

Nashik News : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ऊस शेतीमध्ये होतो आहे. खतांचा व पाण्याचा वापर कमी होऊन खर्च वाचवत उत्पादन वाढले असल्याचे संशोधन झाले आहे. शेती क्षेत्राची व्याप्ती वाढत असून पिकाची स्थिती समजण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. कृषी क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी नॅनो खताप्रमाणे कृषी क्षेत्रात नाविन्यता आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन

इंडियन फारमर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेडचे (इफ्को) संचालक विवेक कोल्हे यांनी केले.‘इफ्को’च्या वतीने शुक्रवारी (ता. २) निफाड येथे नॅनो खते, द्राक्ष व कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कोल्हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे होते.

तर व्यासपीठावर इफ्को किसान फायनान्सच्या (नवी दिल्ली) संचालिका साधना जाधव विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी आमले, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, इफ्कोचे राज्य विपणन व्यवस्थापक यू. आर. तिजारे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. एम. एस. पोवार आदींची उपस्थिती होती.

कोल्हे म्हणाले, की शेतीसाठी खते आता खिशात नेता येतील. जगभरातून मागणी होते आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात नॅनो खते निर्यात होत आहेत. ब्राझील, नेपाळ यासारख्या देशात मागणी होते आहे. नावीन्यपूर्ण संकल्पना असल्याने प्रतिसाद सुरुवातील कमी होता; मात्र शेतकरी अनुभवाने आणि विश्‍वासाने दिवसेंदिवस मागणी वाढवत आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे.

निफाडमधील शेती धोरणाने जगाला दिशा देण्याचे काम आजवर केल्याचे त्यांनी नमूद केले.रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी इफको भूमिका मांडते. नॅनो फर्टिलायझर हे खत उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे ठरते आहे. प्रदूषणाने खतांचा परिणाम तितकासा पिकांवर होत नाही; मात्र नॅनो खतांमुळे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त फायदा थेट पिकांना मिळतो. यामुळे पाणी आणि मृदा प्रदूषण होत नाही, असेही शेवटी कोल्हे म्हणाले

या कार्यक्रमासाठी दिपक मालपुरे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, पंचायत समितीचे कृषी अधिकारी बाळासाहेब खेडकर, निफाडच्या नगराध्यक्षा शारदा कापसे, उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, रमेशचंद्र घुगे, संपतराव डुंबरे, सचिन गिते, बापू मोरे, रामभाऊ माळोदे, क्षेत्र अधिकारी निमिष पवार, क्षेत्र प्रतिनिधी नितीन उमराणी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT