Food Processing Industry  Agrowon
ॲग्रो विशेष

PMFME Scheme : ‘सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग’मध्ये अहिल्यानगर जिल्हा प्रथम

Food Processing Industry : पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ देण्यात अहिल्यानगर जिल्हा राज्यात पहिला आला आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ देण्यात अहिल्यानगर जिल्हा राज्यात पहिला आला आहे. यावर्षी ५०१ तर ३ वर्षांत ही संख्या १४३५ अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आले आहेत. प्रथम पुरस्कार देऊन कृषिमंत्र्याच्या हस्ते अहिल्यानगर जिल्हा कृषी विभागाला गौरवण्यात आले आहे.

शेतकरी, तरुणांना शेती प्रक्रिया उद्योगात उतरण्यासाठी, शेतकऱ्यांनी स्वतः पिकवलेल्या शेतीमालावर प्रक्रिया करावी यासाठी शासनाने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू केली. दहा लाखांपर्यंत या योजनेतून अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ घेऊन अनेक शेतकऱ्यांनी घरीच प्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत.

या योजनेतून अहिल्यानगर जिल्ह्यात तीन वर्षात दुग्धजन्य पदार्थांच्या ३९०, फळे व भाजीपाला प्रक्रियेच्या ४२७, कडधान्य प्रक्रियेच्या १३०, पशुखाद्य प्रक्रियेच्या ७१, तेलबिया प्रक्रियेच्या ५५, बेकरी प्रक्रियेच्या ५५ तसेच इतर विविध प्रक्रिया उद्योग सुरू झाले.

या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात लाभार्थ्यांना ९० कोटीचे अनुदान वाटप केले आहे. त्याचबरोबर या योजनेतून अधिक लाभार्थींनी लाभ घ्यावा यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न झाले. यंदा वर्षभरात राज्यात सर्वाधिक ५०१ तर तीन वर्षांत १४३५ लाभार्थ्यांना लाभ देत राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.

पुणे येथील बालेवाडीमध्ये झालेल्या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी प्रति प्रकल्प कर्ज ११ लाख आणि ६ लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात ९० कोटी रुपयांचे अनुदान अन्नप्रक्रिया उद्योगांना वितरित झाले आहे.

राज्यात प्रतिलाभार्थी अनुदान वितरणामध्ये अहिल्यानगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. बालेवाडी, (पुणे) येथे राज्यस्तरीय कृषी अधिकारी कार्यशाळे प्रसंगी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांचा पुरस्कार देऊन गौरव केला. प्रधान सचिव विकास रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विजयकुमार आवटे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT