NABARD Award  Agrowon
ॲग्रो विशेष

NABARD Award : अहिल्यानगर जिल्हा बँकेला ‘नाबार्ड’चा पुरस्कार

Ahilyanagar DCC Bank : जिल्हा सहकारी बँकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी जिल्हा बँक म्हणून अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार मिळाला आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : जिल्हा सहकारी बँकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी जिल्हा बँक म्हणून अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘नाबार्ड’च्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात पुरस्काराने गौरवण्यात आले.

‘नाबार्ड’ने २०२३-२४ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना पुरस्कार जाहीर केले. यामध्ये जिल्हा सहकारी बँकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी जिल्हा बँक म्हणून अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार मिळाला आहे.

पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा) पुणे येथे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्षे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘नाबार्ड’चे गोवर्धन सिंह रावत, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रदीप दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, डॉ. व्ही. श्रीधर, रश्मी दराडे, के. रवींद्रराव, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात शासनाच्या विविध योजना ज्यात पीएम जेडीवाय, पीएम मुद्रा, एपीवाय तसेच केंद्र सरकारच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे संगणकीकरण या महत्त्वाकांक्षी योजनांसह अनेक बाबींमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी, ठेवीदारांसाठी व सह‌कारी संस्थांसाठी उत्कृष्ट सेवा ही देत आहे.

जिल्हा बँक ही नेहमीच शेतकरी आणि सहकारी संस्थांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करत असल्याने जिल्ह्याच्या विकासाचे केंद्रबिंदू म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिले जाते. ‘नाबार्ड’ ही संस्था देशाची मानाची संस्था असल्याने अशा संस्थेकडून जिल्हा बँकेस पुरस्कार मिळणे हे बँकेच्या दृष्टीने सन्मानाची व अभिमानाची बाब आहे.

२०२४-२५ या आर्थिक वर्षाचा विचार केला असता बँकेचे भाग भांडवल रुपये ३८१ कोटी, निधी रुपये १४४१ कोटी, ठेवी रुपये ९८८६ कोटी, गुंतवणुका रुपये ४७८३ कोटी, दिलेले कर्जे रुपये ६८९६ कोटी, खेळते भांडवल रुपये १३४५८ कोटीचे असून बँक सातत्याने नफ्यात असते. बँकेचे नेट एनपीए शून्य टक्के आहे. ही सर्व परिस्थिती पाहता देशात व राज्यात अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही भक्कमपणे उभी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurment : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १० हजार ४०० कोटी रुपये दिल्याची केंद्र सरकारची माहिती; सीसीआयच्या खरेदीपासून शेतकरी मात्र वंचित

Maharashtra Unseasonal Rain: उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; राज्यात कोकण वगळता वादळी पावसाचा इशारा

Village Governance: ग्रामसभा आणि ग्रामस्तरावरची अंमलबजावणी

Dam Water Storage: मंगरूळ, सुकी, अभोडा धरणांत जलसाठा मुबलक

Vidarbha Irrigation Projects: विदर्भातील ५ सिंचन प्रकल्पांची कामे भूसंपादनाअभावी प्रलंबित- गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT