Dhananjay Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Dhananjay Munde : खरीप हंगामासाठी १ कोटी ३ लाख शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेंतर्गत सहभाग; धनंजय मुंडे यांचे इतर शेतकऱ्यांना आवाहन

PM Crop Insurance Yojana : राज्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १ रूपयात पीक विमा योजना सुरू आहे. त्यावरून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी १ रूपयांचा हप्ता भरून आपली पीकं सुरक्षीत करावीत, असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह कृषी विभागाने केले होते. त्यानंतर आता याबाबत मुंडे यांनी, राज्यातील १ कोटी हून अधिक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सहभाग घेतल्याची माहिती गुरूवारी (ता.११) दिली आहे.

कृषी मंत्री मुंडे यांनी याबाबत समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये मुंडे यांनी, प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत राज्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत १ कोटी ३ लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्याचे म्हटले आहे. तर या सहभागी शेतकऱ्यांनी १ रूपयात आपला पीक विमा भरून योजनेत सहभाग घेतल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १ रूपयात पीक विमा घेण्यासाठी फक्त ५ दिवसांचा अवधी शिल्लक असल्याचेही मुंडे यांनी सांगितले आहे. तर राज्यातील उर्वरित सर्व शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढावा. १ रूपयात पीक विमा निर्धारित वेळेत भरून आपली पीकं संरक्षित करावीत असे आवाहन कृषी मंत्री मुंडे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

याआधी देखील मुंडे यांनी अतिवृष्टी, वादळ, पूर अशी नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांनी आपले आर्थिक नुकसान टाळावे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत १ रूपयात पीक विमा घ्यावा. यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले होते.

तसेच योजनेसाठी अंतिम मुदत १५ जुलै असून केंद्र शासनाने पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in सुरू केले आहे. तरी शेतकऱ्यांनी १ रूपया भरून आपल्या पिकाचा विमा घ्यावा असे आवाहन मुंडे यांनी केले होते. तर विमा काढण्यात काही अडचणी आल्यास तालुकास्तरावरील पीक विमा प्रतिनिधीशी संपर्क करावा असेही मुंडे यांनी म्हटले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MGNREGA Scheme Issue: मनरेगात मजुर आणि निधी कपात; राज्यातील ३.१२ लाख कामे ठप्प – विजय वडेट्टीवार

Dhan Anudan: धान शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार कधी देणार?; मुनगंटीवारांचा सवाल

Silk Farmers: अंडीपुंज कायदा जागरूकतेवर मंथन

Crop Damage Compensation: पीक नुकसानीची भरपाई द्या

Maharashtra Irrigation: आमदाबाद, नाचनवेल तलावात पोहोचले पाणी

SCROLL FOR NEXT