PM Kisan Samman Nidhi Yojana : पीएम किसान सन्मान निधीच्या १७ व्या हप्ताची तारीख जाहीर; मात्र वेबसाइट ठप्प

PM Kisan 17th Installment Date 2024: पीएम किसान सन्मान निधीच्या १७ व्या हप्त्याची घोषणा झाली आहे. आता रक्कम कधी जमा होणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. याबाबत माहिती समोर आली असून १७वा हप्ता १८ जूनला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
PM Kisan Sanman Nidhi
PM Kisan Sanman NidhiAgrowon

Pune News : पीएम किसान सन्मान निधीची वाट पाहणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खुशखबर असून लवकरच १७ वा हप्त्याची रक्कम थेट खात्यावर वर्ग होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जून रोजी पीएम किसानचा १७ वा हप्ता जारी करतील. त्यानंतर देशातील ९ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर १७ व्या हप्त्याचे २००० रूपये जमा होतील. मोदी सरकार ३.० च्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला. शेतकऱ्यांशी संबंधित फाइलवर स्वाक्षरी करत पहिला निर्णय घेत पीएम किसान सन्मान निधीचा १७वा हप्ता जारी केला. मोदींनी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत यंदा सुमारे २० हजार कोटी रुपयांची तरतूद केली. ज्याचा ९ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.

याआधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमातून केंद्र सरकारने पीएम किसानचे १६ हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. पीएम किसानचा १६ वा हप्ता २८ फेब्रुवारी २०२४ रोजी वर्ग करण्यात आला होता. तेंव्हा ३ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जारी करण्यात आले होते. त्यानंतर अनेक महिन्यांपासून पीएम किसान सन्मान निधीच्या १७ व्या हप्त्याची वाट शेतकऱ्यांकडून पाहिली जात होती. ती प्रतिक्षा आता संपली आहे. पंतप्रधान मोदी १८ जून रोजी काशी दौऱ्यावर असणार असून तेंव्हा १७ वा हप्ता जारी करतील. तसेच या दौऱ्यात मोदी शेतकरी परिषदेला संबोधित देखील करणार आहेत.

PM Kisan Sanman Nidhi
PM Kisan : ‘पीएम किसान’च्या फाईलवर सही करून मोदींकडून कामाचा श्रीगणेशा

मात्र अधिकृत वेबसाइट ठप्प

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १७ व्या हप्त्याची घोषणा झाली असून आता तारीख देखील जाहीर झाली आहे. मात्र योजनेची अधिकृत वेबसाइट ठप्प झाली असून कित्येक तासांनंतरही पूर्ववत झालेली नाही. १२ जूनच्या संध्याकाळपासून ते १३ जूनच्या सकाळपर्यंत वेबसाइट ठप्प झाली आहे. वेबसाइट ठप्प झाल्याने ई-केवायसी सुविधेचा लाभ मिळत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेचे पैसे मिळतील की नाही याची चिंता वाटत आहे. तसेच शेतकऱ्यांना खाते स्थिती, लाभार्थी यादी पाहणे यांसारख्या कामांमध्ये देखील अडचणी येत आहेत.

PM Kisan Sanman Nidhi
PM Kisan : पी.एम. किसान सन्मान निधी लाभासाठी पातळीवर विशेष मोहीम

यामुळे वेबसाइट ठप्प

देखभालीच्या कामामुळे पीएम किसान पोर्टल १२ जून २०२४ रोजी संध्याकाळी ५ ते ७ पर्यंत उपलब्ध नसेल, अशी सूचना पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली होती. मात्र आता १३ जून रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतही पोर्टल कार्यान्वित झालेले नाही. वेबसाईट कधी रिस्टोअर केली जाईल याबाबतही अद्याप कोणतेही माहिती स्पष्ट झालेली नाही.

हेल्पलाइनची मदत घ्या

एकीकडे वेबसाइट ठप्प झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्या मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. यादरम्यान अडचणींच्या सोडवणुकीसाठी कृषी विभागाकडून पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक ०११-२४३००६०६, १५५२६१ कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच या क्रमांकांवर फोन करून त्यांच्या समस्या सोडवू शकतात असेही विभागाने सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com