New Delhi : देशाची राजधानी नवी दिल्ली येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार’ बुधवारी (ता.१०) स्वीकारला. दिल्ली येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा पुरस्कार मुख्यमंत्री शिंदे यांना दिला. यावेळी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे, राज्य कृषी मूलभूत आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीच्या-२०२४ काँनक्लेव्हचे अॅग्रीकल्चर टुडे समूहाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास धोरणांची दखल घेत महाराष्ट्र राज्याची सर्वोत्तम कृषी राज्य म्हणून निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला अॅग्रीकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉ. एम.जे. खान, राज्याच्या कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, भारताचे माजी सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्यासह उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, नागालँड आणि राज्याचे इतर मंत्री उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, महाराष्ट्राला सर्वोत्तम कृषी राज्याचा मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच राज्यातील शेतकऱ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच शिंदे यांनी बांबूची खासियत सांगितली. महाराष्ट्र सरकारने सुमारे २१ लाख हेक्टर जमिनीवर बांबूची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना सात लाख रुपये अनुदान दिले जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले, महाराष्ट्र हे कृषी क्रांतीचं जनक राज्य असून राज्याला हरित क्रांतीची समृद्ध परंपरा आहे. कृषी व शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची गौरवशाली परंपरा आमच्या राज्यात आहे. त्यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत आहे. आपण स्वत: एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो असल्याने या पुरस्काराचे महत्त्व अधिक आहे. तर महाराष्ट्राची निवडल्याबद्दल ‘अॅग्रीकल्चर टुडे’ आणि परीक्षक मंडळाचे आभार मानतो. हा पुरस्कार राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान असून शेतकऱ्यांचे कष्ट, मेहनतीची फलश्रुती असल्याचेही शिंदे म्हणाले.
यावेळी राज्य शासनाने बांबू मिशनला प्राधान्य दिले असून, बांबू ही विशेष वनस्पती आहे. बांबू पासून २००० प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात अशी माहिती शिंदे यांनी पुरस्कार स्वीकरताना दिली. ‘बांबू घास नही खास है’ असे म्हणत बांबू मुळे पर्यावरण संवर्धन होते असेही शिंदे यांनी म्हटले आहे. कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून कौतूक मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने बांबूची लागवड करण्याचे ठरवले आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी राज्यात सुमारे १० लाख लाख हेक्टर जमिनीवर बांबूची लागवड केली जाणार आहे. हा निर्णय क्रांतिकारक असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. तर बांबूची लागवडीवरून मुख्यमंत्री शिंदे यांचे चौहान यांनी कौतुक केले आहे.
यावेळी राज्य शासनाने बांबू मिशनला प्राधान्य दिले असून, बांबू ही विशेष वनस्पती आहे. बांबू पासून २००० प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात अशी माहिती शिंदे यांनी पुरस्कार स्वीकरताना दिली. ‘बांबू घास नही खास है’ असे म्हणत बांबू मुळे पर्यावरण संवर्धन होते असेही शिंदे यांनी म्हटले आहे. कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून कौतूक मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने बांबूची लागवड करण्याचे ठरवले आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी राज्यात सुमारे १० लाख लाख हेक्टर जमिनीवर बांबूची लागवड केली जाणार आहे. हा निर्णय क्रांतिकारक असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. तर बांबूची लागवडीवरून मुख्यमंत्री शिंदे यांचे चौहान यांनी कौतूक केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.