GM Seed Agrowon
ॲग्रो विशेष

GM Seeds Ban: सोयाबीन आणि कडधान्य पिकांमध्ये जीएमच्या वापराला कृषिमंत्री चौहान यांचा नकार

GM crops India : दिल्ली येथील भारतीय किसान संघाच्या आयोजित परिषदेत शिवराजसिंह चौहान यांनी तेलबिया आणि कडधान्याची उत्पादकता वाढवण्यासाठी जीएमचा बियाण्यांचा वापर करणे निसर्गाशी खेळ ठरेल, असं प्रतिपादन बुधवारी (ता.२६) केलं आहे.

Dhananjay Sanap

India Rejects GM Seeds : देशात जनुकीय सुधारित (जीएम) बियाण्यांचा वापर करण्यास केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान नकार दिला आहे. देशातील शेतकऱ्यांची उत्पादकता विविध कारणांने घटत आहे. त्यामुळं अभ्यासक आणि शेतकरी नेते जीएम बियाण्यांच्या वापर करण्यात यावा, अशी मागणी करत आहेत.

यावरून दिल्ली येथील भारतीय किसान संघाच्या आयोजित परिषदेत शिवराजसिंह चौहान यांनी तेलबिया आणि कडधान्याची उत्पादकता वाढवण्यासाठी जीएमचा बियाण्यांचा वापर करणे निसर्गाशी खेळ ठरेल, असं प्रतिपादन बुधवारी (ता.२६) केलं आहे. 

जीएम बियाण्यांचा वापराने उत्पादकता वाढेल. परंतु तो निसर्गाशी खेळ ठरेल, असं कृषिमंत्री चौहान म्हणाले. यावेळी देशातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी दर्जेदार बियाण्यांची गरज आहे. आम्ही त्यासाठी प्रयोगशाळेतील बियाणे शेतकऱ्यांपर्यंत तातडीने पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु आमचे काही मर्यादा असल्याची कबुली देत जीएमला मात्र ठाम विरोध असल्याचं चौहान यांनी स्पष्ट केलं.  

कृषिमंत्री चौहान म्हणाले, "आम्ही अन्नधान्य पिकांमध्ये जीएम बियाण्यांच्या वापरास परवानगी देत नाहीत. इतर देशांमध्ये अन्नधान्य पिकांमध्ये जीएम बियाणे वापरून भरघोस उत्पादन घेतलं जातं. त्यांचा उत्पादन खर्चही कमी येतो. भारत आणि अन्य देशातील सोयाबीन आणि डाळीच्या उत्पादकतेत खूप अंतर आहे, कारण ते जीएमचा वापर करतात. परंतु आम्ही मात्र निसर्गाशी खेळत नाहीत." अशी भूमिका चौहान यांनी स्पष्ट केली.   

यावेळी चौहान यांनी तेलबिया पिकांचे भाव सुधारण्यासाठी खाद्यतेल आयातीवर शुल्क वाढवल्याचा दाखला दिला. खाद्यतेलावरील आयातशुल्क शून्यावरून २७ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलं. त्यामुळे सोयाबीन बाजाराला आधार मिळून शेतकऱ्यांना फायदा मिळाला नाही, परंतु आम्ही भविष्यातही या प्रकारचे निर्णय घेऊ,असा दावा कृषिमंत्र्यांनी केला. 

तसेच सरकार शेतकऱ्यांना गुणवत्तापरून बियाणे देण्यावर लक्षकेंद्रित करत आहे. तर सुधारित यांत्रिकीकरण, शेतकामाच्या पद्धतीतील बदल आणि शेतकऱ्यांना मिळणारा नफा यावर काम करत असल्याचा दावा देखील कृषिमंत्री चौहान यांनी केला. तर मोदी सरकारच्या निर्णयांच्या कौतुकाचा महिमा गायला. 

तेलबिया आणि कडधान्य पिकांची मागणी दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येसोबत वाढू लागली आहे. देशात अन्नसुरक्षेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भारताची खाद्यतेलाची निकड पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबित्व आहे. त्यामुळे खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. उद्दिष्ट गाठवण्यासाठी तेलबियांची उत्पादकता वाढवणे आवश्यक आहे.

याच पार्श्वभूमीवर सोयाबीन, मोहरी, कडधान्य पिकांमध्ये जीएमच्या वापराला परवानगी देण्याची मागणी उद्योगाकडून केली जात आहे. जगभरात संशोधनानंतर विविध पिकांमध्ये जीएम स्वीकारलं गेलं आहे. परंतु भारतात मात्र त्याला अद्यापही विरोध कायम आहे, असं जाणकार सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT