GM Technology : जीएम तंत्रज्ञानाला यापुढील काळात विरोधाची धार तीव्र करणार

GM Crop : जीएम शेतीमालामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो ही बाब स्पष्ट आहे. त्यामुळेच भारतीय नॉन जीएम सोया पेंडसह इतर उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत मागणी आहे.
GM Crops
GM CropsAgrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : नागपूर ः जीएम शेतीमालामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो ही बाब स्पष्ट आहे. त्यामुळेच भारतीय नॉन जीएम सोया पेंडसह इतर उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत मागणी आहे. त्याची दखल घेत भारतीय किसान संघाचा जीएम तंत्रज्ञानपूरक शेतीमालाला असलेला विरोध यापुढील काळात आणखी तीव्र केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय संघटनमंत्री दिनेश कुळकर्णी यांनी दिली.

गुवाहाटी (आसाम) मध्ये भारतीय किसान संघाचे नुकतेच दोन दिवसीय शिबिर पार पडले. या शिबिरात मार्गदर्शन करताना श्री. कुळकर्णी यांनी ही भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेमुळे देशाअंतर्गत शेती तंत्रज्ञान उपलब्धतेचा मार्ग आणखी खडतर होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. दिनेश कुळकर्णी यांच्या माहितीनुसार, जीएम पिकांच्या विरोधात किसान संघाने देशव्यापी विरोध भूमिका घेतली आहे.

GM Crops
GM Crop : जीएम असो वा जिनोम : विरोध मात्र कायम

देशभरातील खासदारांना या संदर्भाने निवेदन दिले जात आहेत. जीएम शेतीमाल हा शेतकऱ्यांच्या आर्थिक फायदा किंवा नुकसानीपुरता मर्यादित मुद्दा नाही तर तो देशातील सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी जुळलेला मुद्दा आहे. याला परवानगी मिळाल्यास नागरिक, पर्यावरण व संलग्न भागधारकांच्या जीवनाशी ती एक खेळी ठरणार आहे.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे तत्कालीन संचालक केशव क्रांती यांनी २००१-०२ मध्ये सादर करण्यात आलेल्या एका पेपरमध्ये बीटी तंत्रज्ञानाचा प्रभाव ५० दिवसांनंतर संबंधित पिकातून कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.

त्यासोबतच जीएम तंत्रज्ञान हे एका विशिष्ट किडीवर नियंत्रणासाठी राहते त्यातून उत्पादकता वाढ होत असल्याचा दावा निखालस खोटा आहे.

- दिनेश कुळकर्णी,

संघटन मंत्री, अखिल भारतीय

किसान संघ, नवी दिल्ली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com