Groundnut Agrowon
ॲग्रो विशेष

Groundnut Farming: भुईमूग पेरणीला कृषी विभागाकडून प्रोत्साहन

Groundnut Seed Subsidy for Farmers : कृषी विभागाच्या वतीने इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांना अनुदानावर भुईमूग बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीला वेग आला असून, महाडीबीटी वेबसाइटवर अर्ज करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Team Agrowon

Pune News: इंदापूर तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने कमी दरात शेतकऱ्यांना भुईमुगाचे बियाणे उपलब्ध करून देऊन प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीस मोठ्या प्रमाणात वेग आला आहे.

सध्या सर्वत्र तेलबियांचे उत्पादन घटत असल्याने शासनामार्फत शेतकऱ्यांना तेल बियांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न होत असताना दिसत आहे. पेरणीसाठी बियाणांना अनुदान देऊन शेतकऱ्यांना तेल बियांचे उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहित केले जात आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील वडापुरी, अवसरी, बेडसिंग बाभूळगाव, भाटनिमगाव, काटी, रेडा, रेडणी, शेटफळ हवेली, पंधारवाडी या परिसरात उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीस वेग आल्याचे पहावयास मिळत आहे.

भुईमूग, तीळ, सोयाबीन इत्यादी तेल बियाणांना अनुदान देऊन शेतकऱ्यांना तेल बियाणांची उपलब्धता करून देण्यात येत असून, शेतकऱ्यांकडून उत्पन्न कसे वाढवता येईल. याकडे लक्ष दिले जात आहे.

महाडीबीटी वेबसाइटवर अर्ज

गळीत धान्य विकास योजनेंतर्गत भुईमूग व तीळ या तेलवर्गीय पिकांचे प्रमाणित बियाणे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी १२ जिल्ह्यात हा कार्यक्रम आहे. जिल्ह्यात भुईमूग प्रमाणित बियाणांसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या महाडीबीटी या वेबसाइट वर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अनुदानावर शेंगदाण्याची ४० किलोची बॅग दिली जाणार असून, या बियाण्याच्या वाटपासाठी ७/१२, ८ अ व आधार कार्ड देऊन परवाना दिला जात आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे तेलबिया प्रकल्प अंतर्गत प्रमाणित बियाणे या घटकासाठी महाडीबीटी वेबसाइटवर अर्ज करावेत.
भाऊसाहेब रूपनवर, इंदापूर तालुका कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

Crop Damage: मे, जूनमध्ये पावसामुळे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाची माहिती

Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम

Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना

Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT