Agricultural Adivisary Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Adivisory : कोकण विभागासाठी कृषी सल्ला

Mango Crop Management : आंबा, काजू, चिकू झाडाचे कडक उन्हापासून तसेच बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी झाडाच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावावी. आंबा मोहर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी.

Team Agrowon

आंबा, काजू, चिकू झाडाचे कडक उन्हापासून तसेच बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी झाडाच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावावी. आंबा मोहर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत रासायनिक कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी. फवारणी करणे गरजेची असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या मधमाशी सारख्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी वगळून फवारणी करावी.

उन्हाळी भात

पेरणी

पाण्याची उपलब्धता असेल अशा ठिकाणी भात

पिकाची रोपवाटिका तयार करण्याच्या कामांस सुरुवात करावी.

भात पिकाची रोपवाटिका रहू पद्धतीने (३६ ते ४८ तास कालावधीत मोड आलेले बियाणे) तयार करण्यासाठी रोपवाटिका क्षेत्रामध्ये चिखलणी करावी.

चिखलणीच्या वेळेस चांगले कुजलेले शेणखत

१०० किलो या प्रमाणे प्रति गुंठा क्षेत्रास जमिनीमध्ये मिसळावे.

गादी वाफे पद्धतीने भात पिकाची रोपवाटिका

करण्यासाठी जमीन नांगरून समपातळीत

आणावी. त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत

१०० किलो या प्रमाणे प्रति गुंठा क्षेत्रास जमिनीमध्ये मिसळावे.

जमिनीचा उतार लक्षात घेऊन तळाशी १२० सें.मी.

व पृष्ठभागी ९० सें.मी. रुंदीचे, ८ ते १० सें. मी.

उंचीचे योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करावेत.

एक एकर क्षेत्रावरील पुनर्लागवडीसाठी रोपवाटिका चार गुंठे क्षेत्रावर तयार करावी.

पेरणीच्या वेळेस युरिया १ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट ३ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश ८०० ग्रॅम प्रति गुंठा क्षेत्र या प्रमाणे खतमात्रा द्यावी.

पेरणी १० सें.मी. अंतरावर ओळीमध्ये २.५ सें. मी. खोलीवर करून बियाणे मातीने झाकून घ्यावे.

मोहरी

वाढीची अवस्था

मोहरी पिकामध्ये मावा या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. मावा कीड पिकाच्या कोवळ्या शेंड्यावर पानाच्या खालच्या भागातील रस शोषून घेते. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. तसेच किडीने बाहेर टाकलेल्या मधासारख्या चिकट द्रवामुळे पानांजवळ काळ्या बुरशीची वाढ दिसून येते. माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी,

रासायनिक फवारणी (प्रमाण ः प्रतिलिटर पाणी)

डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १.२ मिलि किंवा

लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मिलि

आंबा

मोहोर अवस्था

आंबा फळावरील फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून झाडाखाली व बुंध्याजवळील जमीन हिवाळ्यात १० ते १२ सेंमी खोल नांगरून घ्यावी. त्यामुळे फळमाशीचे सुप्त अवस्थेतील कोष नष्ट होऊन भविष्यातील प्रादुर्भावाची तीव्रता कमी होण्यास मदत होते.

फुलकिडे

फुलकिडीचा प्रादुर्भाव आंब्याच्या मोहर व फळांवर दिसून येण्याची शक्यता आहे.

फुलकिडे आकाराने सूक्ष्म असून डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. या किडीचे प्रौढ पिवळे किंवा गडद चॉकलेटी, तर पिल्ले पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे असतात.

पिल्ले आणि प्रौढ पाने, मोहोर, कोवळे दांडे आणि फळावरील साल खरवडून रस शोषण करतात. कोवळ्या सालीचा भाग खरवडल्यामुळे तो भाग काळा पडतो. मोहर काळा पडून गळून पडतो.

नियंत्रणासाठी,

स्पिनोसॅड (४५ टक्के प्रवाही) २.५ मिलि

जास्त प्रादुर्भावामध्ये दुसरी फवारणी थायोमिथॉक्झॉम (२५ टक्के डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

किमान तापमानात होणारी घट यामुळे आंब्याच्या फळे धरलेल्या फांद्यावर पुन्हा नवीन मोहर येण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्नद्रव्यांचे वहन नवीन मोहराकडे होऊन जुन्या मोहराला असलेल्या वाटाणा ते गोटी आकाराच्या फळांची गळ दिसून येते. यासाठी मोहर अवस्थेत असलेल्या आंबा झाडावर पुर्नमोहर प्रक्रिया टाळण्यासाठी जिब्रेलिक ॲसिड (५० पी.पी.एम) १ ग्रॅम प्रति २० लिटर पाण्यात मिसळून स्वतंत्र फवारणी करावी. ही फवारणी झाडाला पुरेसा मोहर आला असल्याची खात्री झाल्यानंतरच झाडावरील मोहोर पूर्ण उमललेला असताना आणि नंतर पुन्हा मोहरीच्या आकाराची फळे झाल्यावर करावी.

कमी झालेल्या किमान तापमानामुळे व इतर हवामान घटकांच्या अनुकूलतेमुळे काही ठिकाणी आंब्यामध्ये मोहरधारणा होत आहे. अशा ठिकाणी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार मोहरलेल्या झाडांमध्ये फळगळ कमी होऊन चांगली फळधारणा होण्यासाठी आम्रशक्ती या विद्राव्य अन्नद्रव्याची १ लिटर प्रति १९ लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सदर २० लिटर द्रावण हे चार मोहरलेल्या झाडांसाठी वापरावे.

मोहर धारणा होऊन १५ ते २० दिवस झालेल्या आंबा बागेमध्ये काही ठिकाणी फळधारणा होऊन फळे कणी व वाटाणा आकाराची आहेत. अशा बागामध्ये चांगल्या प्रतिच्या आंबा फळांचे उत्पादन मिळविण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट (१ टक्के) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. सदर फवारणी फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत अशा एकूण ३ फवारण्या कराव्यात.

वाढणारे किमान तापमान लक्षात घेता हापूस आंब्यामध्ये फळगळ कमी करण्यासाठी फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर नॅप्थेलिन ॲसिटिक ॲसिड (२० पीपीएम) १ ग्रॅम प्रति ५० लिटर पाणी असे द्रावण तयार करून ते मोहरावर फवारावे. दुसरी फवारणी फळे गोटीच्या आकाराची झाल्यानंतर करावी.

तुडतुडे

ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे आंबा फळपिकावर तुडतुड्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

आर्थिक नुकसानीची पातळी (पालवी/मोहोर अवस्था =>१० तुडतुडे प्रति पालवी/मोहोर)

किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.

रासायनिक फवारणी (प्रति १० लिटर पाण्यातून)

पोपटी रंगाच्या पालवीवर ः डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) ९ मिलि,

बोंगे फुटताना ः लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मिलि

मोहर फुलण्यापूर्वीच्या अवस्थेत ः इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के प्रवाही) ३ मिलि किंवा ब्युफ्रोफेझीन (२५ टक्के प्रवाही) २० मिलि

मोहर फुलल्यानंतर कणी अवस्थेत असताना ः थायामेथोक्झाम (२५ टक्के दाणेदार) १ ग्रॅम

भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ५ मिलि किंवा पाण्यात विरघळणारे गंधक (८० टक्के) २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

(टीप ः मोहर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत रासायनिक कीटकनाशकांची फवारणी शक्यतो टाळावी. फवारणी करणे गरजेची असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी वगळून (सकाळी ९ ते १२) फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशकांची फवारणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Rainfall: पावसाने ओलांडली सप्टेंबर महिन्याची सरासरी

Food Processing Project: सातारा जिल्ह्यात ५७ अन्न प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी 

Pollution Crisis:प्रदूषणामुळे उच्चेळीच्या तलावातील मासे मृत

Marathwada Heavy Rains : मराठवाड्यात अतिवृष्टीनं हाहाकार! शेती उद्ध्वस्त, पीकं खरडून गेली, विहिरी पुराचं पाणी आणि गाळानं बुजल्या

Mango Orchard: ठाणे जिल्ह्याच्या मातीमध्ये पुन्हा फुलणार आमराई

SCROLL FOR NEXT