Mumbai News: बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून बाहेर निघणारा रासायनिक घनकचरा परिसरातील निर्जन जागी बेकायदा विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरूच आहेत. उच्चेळी येथील नैसर्गिक तलावाजवळ टाकण्यात आलेल्या रासायनिक घनकचऱ्यामुळे तलावातील मासे मृत होण्याचा प्रकार उघड झाला असून तलावातील पाणी वापरास अयोग्य बनले आहे. याबाबत उच्चेळी ग्रामपंचायतीने रासायनिक घनकचरा उघड्यावर टाकून प्रदूषण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे..पथराळीजवळील उच्चेळी ग्रामपंचायत हद्दीतील तलावात गुरुवारी (ता. १८) रात्री रासायनिक घातक घनकचरा टाकल्याने गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे तलावातील अनेक मासे मृत्युमुखी पडले असून जलचरांसह परिसरातील शेळ्या व इतर जनावरांवरही मृत्यूचे सावट पसरले आहे..Water Contamination : रायगड जिल्ह्यात जमिनीतून दूषित पाण्याचे झरे.मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पाचमार्ग येथून पथराळीमार्गे दांडीकडे जाणाऱ्या मार्गावरून अज्ञात व्यक्तींनी रसायनाने भरलेल्या अनेक गोण्या तलावात टाकल्या. रसायनांच्या तीव्रतेमुळे तलावाच्या काठावरील हिरवे गवत जळून खाक झाले, तर पाण्यातील जलचरांचा बळी गेला. या घनकचऱ्याचा स्रोत तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्याचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे..औद्योगिक क्षेत्राजवळील उच्चेळी येथील निर्जन परिसरात असलेल्या नैसर्गिक तलावाजवळ आठवडाभरापूर्वी रात्रीच्या अंधारात अज्ञात वाहनातून रासायनिक घनकचरा भरलेल्या गोण्या बेकायदा टाकण्यात आल्या. पावसामुळे या गोण्यांमधील रासायनिक घनकचरा तलावाच्या पाण्यात मिसळून शेकडो मासे मृत झाले. त्याचप्रमाणे तलावाच्या काठावरील हिरवे गवतदेखील जळून गेले..Ujani Dam Pollution : उजनी प्रदूषणाबाबत केंद्र सकारात्मक, राज्य शासन उदासीन.उच्चेळी येथील तलावातील पाण्याचा परिसरातील शेतकरी उन्हाळ्यात वापर करीत असून पाळीव जनावरांना धुण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा उपयोग होतो. परिसरातील गावांच्या हद्दीत रासायनिक घनकचरा व औद्योगिक सांडपाण्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचे प्रकार वाढीस लागल्याने शेती, बागायती, पिण्याचे पाण्याचे स्रोत, नाले, तलाव, खाडी आणि समुद्र प्रदूषित होऊन पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे..पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर कुडण गावातील तलावात व दहिसर गावातील शेतात रासायनिक घनकचरा आढळून आल्याची उदाहरणे आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक शेती व पिण्याच्या पाण्याच्या समस्या गंभीर होत चालल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकारी पालघर यांना लेखी तक्रार देण्यात आली असल्याचे उच्चेळीचे सरपंच जितेंद्र खटाळे यांनी सांगितले..उच्चेळी येथील तलावाजवळ गोण्यांमध्ये भरलेला रासायनिक घनकचरा टाकण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. याप्रकरणी क्षेत्र अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देऊन घनकचऱ्याचे नमुने ताब्यात घेण्यास सांगितले असून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - वीरेंद्र सिंह, उपप्रादेशिक अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.