ठळक मुद्देराज्यातील १६ जिल्ह्यांत अतिवृष्टीने हाहाकार बाजरी, सोयाबीन, कापूस, उडीद, कापूस, ऊस, मका, कांदा, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांच्या विहिरी पुराचे पाणी आणि गाळाने बुजल्याशेतपिकं खरडून गेली.Marathwada Heavy Rains Updates : राज्यातील १६ जिल्ह्यांत अतिवृष्टीने हाहाकार उडाला आहे. मुख्यतः मराठवाड्यात शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजरी, सोयाबीन, कापूस, उडीद, कापूस, ऊस, मका, कांदा, तूर आदी पिके पाण्याखाली गेली आहेत. गोदावरील पूर आला आहे. मराठवाड्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये ८ व्यक्ती आणि ७२ जनावारांचा मृत्यू झाला आहे. .लातूर : ६ लाख हेक्टरवरील पिके पाण्याखालीलातूर जिल्ह्यात सुमारे ६ लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, शेतपीक पाण्याखाली गेल्याने निलंगा तालुक्यातील गुंजर्गा गावातील एका शेतकरी महिलेने आक्रोश केला. तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिने सरकारकडे मदतीची मागणी केली आहे..Heavy Rain: परंडा-भूम तालुक्यात पावसाचा कहर.बीडमध्ये मोठे नुकसानबीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील बाजरी, सोयाबीन, कापूस, उडीद आणि अन्य पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सिंधफणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाटोदा, शिरूर, माजलगाव या तालुक्यातील नदीकाठी असलेल्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतीपिकांचं मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विद्युत रोहित्र आणि खांब वाहून गेले आहेत. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. .Ativrushti Madat : जून ते ऑगस्टच्या नुकसानीपोटी १ हजार ३३९ कोटी रुपये मंजूर.शेतकऱ्यांच्या विहिरी पुराचे पाणी आणि गाळाने बुजल्यामौजे नफरवाडी, अनपटवाडी गावाजवळ मांजरा, आरणई नदीचे पात्र आहे. या नदीपात्रालगत असलेल्या सुमारे ४० ते ५० शेतकऱ्यांच्या विहिरी पुराचे पाणी आणि गाळाने बुजल्या आहेत. तसेच नदीपात्रातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. लगतच्या फळबागा, कांदा, सोयाबीन, मका, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. या नुकसानीनंतर बाधित कुटुंबीयांना योग्य ती आर्थिक मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे..सिंदफणा नदीने दिशा बदलली, ४०० ते ५०० एकर पीक क्षेत्र पाण्याखाली शिरूर कासार तालुक्यातील मौजे पांगरी, चाहूरवाडी, सवसवाडी आणि वडाळी परिसरामध्ये ढगफुटी आणि अतिवृष्टीसदृश परिस्थितीमुळे सिंदफणा नदीला मोठा महापूर आला. जाटनांदूर शिवार पार केल्यानंतर सिंदफणा नदी दोन प्रवाहांमध्ये विभागली आहे. त्याठिकाणी पाण्याचा वेग आणि प्रमाण वाढल्याने नदीने आपली दिशा बदलली. या बदललेल्या प्रवाहामुळे सवसवाडी आणि वडाळी परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊस, कापूस, मका, कांदा, तूर आदी पिकांपैकी सुमारे ४०० ते ५०० एकर क्षेत्र पाण्याखाली जाऊन पूर्णपणे सपाट झाले आहे..दगडी बांधकामाच्या विहिरी कोसळल्याया पुरामुळे सिंदफणा प्रकल्पाच्या बॅकवॉटर भागात मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक ठिकाणी जमीन खरडून गेलेली आहे. शेतकऱ्यांच्या दुभत्या गायी वाहून गेल्या आहेत. याशिवाय सिंचन विहिरी गाळ आणि पुराच्या पाण्याने पूर्णपणे भरून गेल्या असून, अनेक जुन्या दगडी बांधकामाच्या विहिरी कोसळल्या आहेत..मांजरा नदी ओव्हरफ्लोपाटोदा शहरात अतिवृष्टी आणि ढगफुटीच्यासदृश परिस्थितीमुळे शहरातील महासांगवी रस्त्यालगतच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये मांजरा नदी ओव्हरफ्लो झाली. ज्यामुळे नागरिकांची घरे पाण्याखाली आली होती. सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती धस यांनी दिली आहे. गेवराईमध्येही अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. .धाराशिव: शेती पूर्णपणे उद्ध्वस्त धाराशिव जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथील रस्ते जलमय झाले आहेत. शेती तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. जालना, परभणी, नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांसह घरांचे नुकसान झाले आहे. .सोलापूर: मोहोळ तालुक्यात पूरस्थितीसोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी, खंदारे वस्ती, मालिकपेठ येथील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे येथील नारिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील डोनगाव आजबे वस्ती येथील २० नागरिकांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. करमाळा येथे शोध आणि बचाव कार्यासाठी एकूण ९ पथके कार्यरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. .यवतमाळ : ३ लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसानयवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार उडाला आहे. येथील ३ लाख हेक्टरवरील क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सोयाबीन, कापूस पिकाला बसला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.