Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Biostimulants: संजीवक, बियाणे: शेतीसाठी वरदान

Agriculture Technology: कृषी क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. जैविक आणि रासायनिक संजीवक शेतीतील उत्पादन वाढवण्यास मदत करत असून, सुधारित बियाण्यांमुळे पिके अधिक रोगप्रतिकारक आणि उत्पादनक्षम होत आहेत.

Team Agrowon

Krishi Sanjeevani Special: भारतातील कृषी क्षेत्र हे सतत विकसित होत आहे. शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी विविध नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. कृषी संजीवक हे जैविक किंवा रासायनिक पदार्थ असतात, जे झाडांच्या वाढीस मदत करतात, उत्पादन वाढवतात आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवतात. हे संजीवक झाडांच्या पोषणासाठी पूरक म्हणून काम करतात. झाडांना सशक्त करतात.

कृषी संजीवकांचे प्रकार

जैविक कृषी संजीवक ः समुद्री गवत अर्क, अमिनो आम्ल, ह्युमिक आणि फुल्विक आम्ल, सूक्ष्मजीव आधारित संजीवक.

रासायनिक कृषी संजीवक : ग्रोथ प्रमोटर्स, नॅनो टेक्नॉलॉजी आधारित संजीवक.

नवीन बियाण्याचे महत्त्व

नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित करण्यात आलेले बियाणे हे अधिक उत्पादनक्षम, कीड, रोग प्रतिकारक आणि हवामान बदलांसाठी अनुकूल असतात.

संकरित बियाणे : अधिक उत्पादन, रोगप्रतिकारक क्षमता जास्त.

जीएमओ बियाणे : विशिष्ट रोग आणि किडींच्या प्रतिकारासाठी अनुकूल, कमी खत आणि पाण्यावर वाढ.

संशोधित बियाणे : पारंपरिक बियाण्यांच्या तुलनेत अधिक पोषणमूल्य, अधिक फायदेशीर.

- एस. बी. देशमुख, ९३७००७८८८०

(प्राचार्य, बी.एल.डी. महाविद्यालय, लासूर स्टेशन, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT