Onion Seed : निर्यातक्षम कांद्यासाठी बियाणे निवड महत्त्वाची

Export Quality Onion : कांदा निर्यात झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो, चांगला बाजारभाव मिळतो, ज्यामुळे त्यांचा आर्थिक स्तर सुधारण्यास मदत होणार आहे.
Onion Seed
Onion Seed Agrowon
Published on
Updated on

Solapur News : कांद्याच्या निर्यातक्षम उत्पादनासाठी कांद्याचे बियाणेनिवड महत्त्वाची ठरते, असे मत मानवलोक, अंबाजोगाई आणि थरमॅक्स फाउंडेशन यांच्यावतीने वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे आयोजित केलेल्या कांदा खरेदीदार-विक्रेता यांच्या निर्यातीसंदर्भातील बैठकीत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

वडाळ्यातील हॅार्टिमॅक्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमध्ये हा कार्यक्रम झाला. मानवलोक अंबाजोगाईचे कार्यवाह अनिकेत लोहिया अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहकार्यवाह लालासाहेब आगळे, ओपेरीस अॅग्रो टेक्नोलॉजीचे आशिष वेले, कांदा विशेषज्ञ दीपक चव्हाण, कांदा निर्यातदार बाळकृष्ण पाटील, कांदा निर्यातदार तुषार देवरे, कांदा व्यापारी अमित जाधव, थरमॅक्स फाउंडेशनच्या सुजाता देशपांडे व सुखदा गायकवाड उपस्थित होते.

Onion Seed
Onion Seed Production: जळगाव जिल्ह्यात कांदा बीजोत्पादन क्षेत्र कमी

यावेळी बोलताना कांदा निर्यातदार बाळकृष्ण पाटील म्हणाले, की कांदा निर्यात झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो, चांगला बाजारभाव मिळतो, ज्यामुळे त्यांचा आर्थिक स्तर सुधारण्यास मदत होणार आहे, पण कांद्याच्या निर्यातीसाठी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजे, कांदा निर्यात करण्यासाठी कांद्याचा दर्जा उत्तम असावा लागतो.

विशेषतः कांदा बियाणे उच्च दर्जाचे असले पाहिजे आणि सर्वोत्तम गुणवत्ता असलेले बियाणेच वापरणे आवश्यक आहे. बियाणे जर शेतकऱ्यांनी स्वतः तयार केले, तर ते अधिक चांगले ठरतात. श्री. देवरे म्हणाले, की शेतकऱ्यांना उत्तम मार्केटिंग आणि निर्यात प्रक्रियेच्या माहितीची आवश्यकता आहे, जेणेकरून ते आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धात्मक ठरू शकतील."

Onion Seed
Onion Seed Production : कांदा बीजोत्पादनात मधमाश्या आकर्षित करण्यासाठी शास्त्रोक्त प्रयोग

मानवलोकचे श्री. लोहिया यांनी शेतकऱ्यांसाठी संस्थेच्यावतीने सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. श्री.वेले यांनी शेतीतील त्यांचे अनुभव सांगितले. कांद्यासह प्रक्रिया उद्योगामध्ये मोठ्या संधी आहेत, असे सांगताना शेतीला प्रतिष्ठा मिळायला हवी, असे मत व्यक्त केले. यावेळी शेतकऱ्यांमध्ये कांदा निर्यातीच्या महत्त्वावर चर्चा झाली. तसेच निर्यात प्रक्रियेतील आव्हाने आणि संधी यावर विचारमंथन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पासाहेब कोरके आणि सुहास भोसले यांनी सूत्रसंचालन केले.

कांदा निर्जलीकरण प्रक्रिया राबविणे गरजेचे

कांदा विशेषज्ज्ञ दीपक चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले, कांदा निर्यातीला आणखी योग्य व फायदेशीर बनवण्यासाठी कांदा निर्जलीकरण प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून कांद्याचे वजन कमी होईल आणि तो दीर्घकाळ टिकवता येईल. तसेच, निर्जलीकरणामुळे निर्यातीच्या दृष्टीने फायदा होईल, कारण वजन कमी होऊन वाहतूक खर्च कमी होईल आणि निर्यात करण्यात अधिक फायदा होईल, असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com