Groundnut Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Advisory : कृषी सल्ला (राहुरी विभाग)

Agriculture Weather Update : पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.

Team Agrowon

Groundnut : हवामान अंदाज : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त अंदाजानुसार, पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.

उन्हाळी भुईमूग

काढणी

पावसाची व सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असल्याने उन्हाळी भुईमूग पिकाची काढणीची तयारी करावी.

कांदा

कांद्याची काढणी शक्य तितक्या लवकर करून घ्यावी. काढणी केलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी ठेवा.

रब्बी पिकांची काढणी

काढणी रब्बी पिकांची काढणी झालेल्या क्षेत्रात लगेच नांगरणी करावी. म्हणजेच शेतातील पिकांचा पालापाचोळा अवशेष इ. जमिनीत गाडले जातात.

काढणी केलेली पिके

साठवणूक

साठवणीतील धान्यांचे किड्यांपासून संरक्षण करण्यासाठी, कापणी केलेल्या पिकांच्या धान्यामध्ये ११-१२ टक्के, कडधान्ये ९ टक्के, तेलबिया ८ टक्के आणि भाजीपाला बियाणे ५-६ टक्के इतका ओलावा राहील, अशा पद्धतीने बियाणे वाळवावेत.

उन्हाळी भाजीपाला

उन्हाळी भाजीपाला पिकांवर मावा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पिकाची नियमित देखभाल करून प्रादुर्भावाच्या सुरुवातीलाच कडूनिंब आधारित कीटकनाशकाची (ॲझाडिरॅक्टिन १००० पीपीएम) २ ते ३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

०२४२६-२४३२३९

(ग्रामीण कृषी मौसम सेवा, आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT