Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Pulses Update : गावठी कडधान्यांची खरेदी- विक्री व आगोट भरण्याची लगबग बाजारात दिसून येत आहे. विशेष म्‍हणजे, देशी कडधान्यांची कोट्यवधीची उलाढाल काळात होत असते.
Pulses
PulsesAgrowon

Mahad News : महाड तालुक्यातील देशी कडधान्यांना जिल्ह्यात व परराज्‍यात मोठ्या प्रमाणात मागणी असते. यंदा महाड तालुक्यातील देशी कडधान्यांबाबत बाजारात तेजीचे वातावरण असल्याचे चित्र आहे. गावठी कडधान्यांची खरेदी- विक्री व आगोट भरण्याची लगबग बाजारात दिसून येत आहे. विशेष म्‍हणजे, देशी कडधान्यांची कोट्यवधीची उलाढाल काळात होत असते.

Pulses
Pulses Market : कडधान्यांची यंदा दुप्पट आयात

एप्रिल महिना उजाडला की आगोट भरण्याची सुरुवात होते. धान्ये, डाळी, कडधान्ये वाळवली जातात. यामध्ये देशी कडधान्यांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. त्‍यामुळे शहरातील व्यापारी मोठ्या प्रमाणात देशी कडधान्यांची खरेदी- विक्री करत असतात. अवकाळी पाऊस, लहरी हवामानमुळे कडधान्ये लागवडीकडे होत असलेले दुर्लक्ष, यामुळे देशी कडधान्यांचे उत्पादन कमी झाल्याने दर यंदा वाढले आहेत.

Pulses
Pulses Market : कडधान्य आयातीचा महापूर धोकादायक पातळीवर

तरीही कडधान्ये खरेदी- विक्री अजूनही सुरूच आहे. दरवर्षी महाड बाजारपेठ व तालुक्यात देशी कडधान्यांची सुमारे एक ते सव्वा कोटीची उलाढाल केवळ दोन महिन्यांतच होत असते. कडधान्यांमध्ये महाडचा वाल, नरवणची चवळी, गोरेगावचे मूग व महाडची मटकी प्रसिद्ध आहे. सर्व कडधान्यांची मिळून ६० ते ७० टनाची विक्री होत असते. कडधान्यांमध्ये सर्वाधिक पसंती व विक्री वाल व मटकीची होत असते. यंदा वाल, पावटाही उपलब्ध झाला आहे.

खाडीपट्टीत मोठ्या प्रमाणावर उत्‍पादन

महाड तालुक्यात व परिसरात पिकणाऱ्या गावठी कडधान्यांना रत्नागिरी, पुणे, मुंबई, पनवेल व परजिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्‍यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनाही रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे. महाड तालुक्यात खाडीपट्ट्यातील चोचिंदे, मुठवली, सव, गोठे, नरवण, तुडील, रावढळ, वलंग, वराठी, दासगाव, वीर, दाभोळ तर माणगावमधील देवळी व गोरेगाव भागात कडधान्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. गावठी कडधान्यांमध्ये पांढरा वाल, पावटा, मूग, उडीद, चवळी, मटकी, हरभरा, तूर याची बाजारात आवक होते. मार्च, एप्रिल महिन्यात शेतकरी कडधान्य घाऊक व्यापाऱ्यांकडे आणतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com