Crop Advisory Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory : कृषी सल्ला (मराठवाडा विभाग)

Team Agrowon

Crop Management :

हवामान अंदाज :

मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या विस्तारीत हवामान अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात ११ ते १७ ऑक्टोबर दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहण्याची शक्यता आहे. या पावसाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी कामांचे नियोजन करावे. विशेषतः पिकांची काढणी केलेली असल्यास त्या शेतीमालाची साठवण सुरक्षित ठिकाणी करावी. फवारणीचे नियोजन पावसाचे उघडीप पाहून करावे.

अहमदाबाद येथील इस्रोच्या ‘सॅक’ या उपग्रहाने घेतलेल्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. या वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे जमिनीतील पाण्याचे प्रमाण कमी होऊन ताण वाढू शकतो. आपल्या पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

तूर

पाने गुंडाळणाऱ्या अळी व शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

ॲझाडिरॅक्टिन (१५०० पीपीएम) २ ते ३ मिलि किंवा

क्विनॉलफॉस (२५%) २ मिलि किंवा

इमामेक्टीन बेन्झोएट (५%) ०.४५ ग्रॅम.

सोयाबीन

काढणी

काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकाची काढणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले सोयाबीन पीक वाळल्यानंतर त्याची मळणी करावी.

रब्बी ज्वारी

खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास रब्बी ज्वारी पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. पेरणी ४५X१५ सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे.

रब्बी हंगामासाठी ज्वारीच्या परभणी सुपर मोती (एसपीव्ही-२४०७), परभणी शक्ती (पीव्हीके-१००९), परभणी मोती (एसपीव्ही-१४११), परभणी ज्योती (एसपीव्ही-१५९५/सीएसव्ही-१८), पीकेव्ही क्रांती, फुले यशोदा, सीएसव्ही-२२ आर, सीएसव्ही-२९आर (एसपीव्ही-२०३३), मालदांडी (एम३५-१), फुल रेवती (एसपीव्ही- २०४८), फुले सुचित्रा या पैकी योग्य त्या वाणांपैकी निवड करावी.

रब्बी सूर्यफूल

खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास रब्बी सूर्यफुलाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. भारी जमिनीत पेरणी ६०X३० सेंमी, तर मध्यम जमिनीत ४५X३० सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे वापरावे. रब्बी हंगामासाठी सूर्यफुलाच्या एल.एस.एफ.एच-१७१, एल.एस.एफ.एच-३५, के.बी.एस.एच-४४, डी.आर.एस.एच-१, एल.एस.एफ-८, एल.एस-११, एल.एस-२०३८ यापैकी योग्य त्या वाणाची निवड करावी.

हरभरा

पेरणीचा कालावधी

हरभरा पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे झाली असल्यास पेरणी करून घ्यावी. कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी.

करडई

पेरणीचा कालावधी

करडई पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे झाली असल्यास पेरणी करून घ्यावी. हमखास पावसाच्या भागात करडई पिकाची पेरणी १५ ऑक्टोबर पर्यंत करावी.

ऊस

वाढीची

अनेक ठिकाणी ऊस पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी क्लोरपायरीफॉस (२० %) २.५ मिलि किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५%) ०.४ मिलि.

तुती रेशीम उद्योग

किटकनाशक, तणनाशक, बुरशीनाशक किंवा रासायनिक खत या चारही प्रकारच्या निविष्ठा रेशीम शेतीमध्ये चालत नाहीत. तुती लागवडीसाठी २० टन शेणखत किंवा ५ टन गांडूळ खत प्रति हेक्टर वापरावे. केवळ रासायनिक खतांवर वाढवलेल्या तुती पानांमध्ये रसायनांचे अंश येण्याची शक्यता असते. कोणत्याही प्रकारे रसायनांचे अंश आल्यास अळ्या मरण्याचे प्रमाण वाढते.

ज्या शेतामध्ये मिरची किंवा तंबाखूचे पीक असेल, तेथे तुती लागवड करू नये. रेशीम कीटक चौथ्या किंवा पाचव्या अवस्थेत मृत पावण्याचे हेच कारण होय.

शेजाऱ्याने कीटकनाशक फवारणी केली तरीही रेशीम कीटकांवर परिणाम होतो.

संत्रा/मोसंबी

फळवाढीची अवस्था

या बागेत फळगळ दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी चिलेटेड झिंक ५ ग्रॅम + चिलेटेड आयर्न ५ ग्रॅम + जिबरेलिक ॲसिड १० मिलि + सल्फेट ऑफ पोटॅश (००:००:५०) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी.

डाळींब

फळवाढीची अवस्था

डाळींब बागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी चिलेटेड झिंक ५ ग्रॅम + चिलेटेड आयर्न ५ ग्रॅम + जिबरेलिक ॲसिड १० मिलि + सल्फेट ऑफ पोटॅश (००:००:५०) १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.

डॉ. के. के. डाखोरे, ९४०९५४८२०२

(मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा.)

डी. डी. पटाईत, ७५८८०८२०४०

(कीटकशास्त्रज्ञ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Crop Loan : पीककर्जासाठी सीबिल धोरण बदला

Tractor Market : येवल्यात १५० वर ट्रॅक्टरची खरेदी

Orange Crop Damage : संत्रा नुकसानग्रस्तांसाठी १३४ कोटींची मागणी

Soybean Market : नांदेड जिल्ह्यात १७ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र

SCROLL FOR NEXT