Sunflower Farming
Sunflower FarmingAgrowon

Sunflower Farming: खानदेशात सूर्यफुलाची पेरणी सुरू

Khandesh Agriculture: कमी कालावधी व बऱ्यापैकी दर देणारे पीक म्हणून खानदेशात यंदा सूर्यफुलाची पेरणी सुरू झाली आहे. यंदा सुमारे २५०० ते ३००० हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज आहे.
Published on

Jalgaon News: कमी कालावधी व बऱ्यापैकी दर देणारे पीक म्हणून खानदेशात यंदा सूर्यफुलाची पेरणी सुरू झाली आहे. यंदा सुमारे २५०० ते ३००० हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज आहे.

मध्यंतरी चार-पाच वर्षे अपवाद वगळता पेरणी होत नव्हती. यंदा पेरणी तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक होईल, असे संकेत आहेत. कारण अन्य पिकांत फारसा नफा नाही. वारंवार एकच पीक घेतल्याने जमीन सुपीकतेचा मुद्दाही तयार होतो. यामुळे पीक फेरपालट करण्यासंबंधीदेखील सूर्यफूल पेरणी केली जात आहे.

Sunflower Farming
Organic sunflower farming: भास्कर वाण सूर्यफूलाची रसायन मुक्त शेती: जाणून घ्या लागवडीची पद्धत!

पाऊस काही भागात बरा तर काही भागात अल्प आहे. यामुळे पेरणी सर्वत्र सुरू नाही. पेरणी ऑगस्टच्या अखेरपर्यंत सुरू राहील. कापूस पिकात गुलाबी बोंड अळीने धुमाकूळ घातला. त्यात मका पिकालाही लष्करी अळीने विळखा घातला आहे. कापूस पीक खर्चिक झाले आहे. कांदा पिकात दरांची शाश्‍वती नाही.

Sunflower Farming
Sunflower Farming : घाटनांद्रा-धारला शेतशिवारामध्ये बहरले सूर्यफुलाचे पीक

अशा स्थितीत धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील यावल, चोपडा, जामनेर या भागांत काही शेतकरी सूर्यफुलाकडे वळले आहेत. सूर्यफूल पेरणीत जळगाव, धुळे जिल्हा १० ते १५ वर्षांपूर्वी आघाडीवर होते. परंतु कमी दर व इतर कारणांमुळे सूर्यफुलाची पेरणी कमी झाली.

मध्यंतरी सूर्यफूल पेरणीची नोंदही दिसत नव्हती. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, जामनेर, पारोळा, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारातील नंदुरबार, नवापूर भागात सूर्यफूल पेरणी होईल, अशी स्थिती आहे. 

विविध वाण उपलब्ध

परंतु अलीकडे आलेले चांगले वाण, दरांची हमी, पावसाची कमी गरज व कमी खर्च यामुळे सूर्यफूल पेरणीला यंदा बरा प्रतिसाद दिसत आहे. पेरणी धुळ्यातील शिरपुरात सुमारे २०० हेक्टरवर आहे.

तसेच जळगावमधील चोपडा, यावल, जामनेरातही मिळून सुमारे १५०० हेक्टरवर पेरणी होईल, अशी स्थिती  आहे. तसेच इतर भागातही पेरणी सुरू  आहे. अनेक शेतकऱ्यांनी आगाप पेरणी केली आहे. एकरी किमान ४० ते ४५ हजार रुपये नफा सुटेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com