Crop Advisory : कृषी सल्ला : राहुरी

Agriculture Update : राहुरी विभागातील कृषी सल्ल्याबाबतची माहिती या लेखातून पाहुयात.
Agriculture Advisory
Agriculture AdvisoryAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture :

तूर

फांद्या वाढीची अवस्था

पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास, नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

मुग, उडीद

साठवणूक

शेंगा खळ्यावर चांगल्या वाळविल्यानंतर काठीच्या सहाय्याने झोडपून दाणे वेगळे करावेत. साठवणीपूर्वी उडीद ५ ते ६ दिवस उन्हात वाळवून नंतर पोत्यात किंवा कोठीत साठवावे. साठवण कोंदट किंवा ओलसर जागेत करू नये. शक्य झाल्यास धान्यास १ टक्का करंज किंवा एरंडीचे तेल चोळावे किंवा कडुनिंबाचा पाला (५ टक्के) धान्यात मिसळून धान्य साठवावे. यामुळे धान्य साठवणुकीतील किडींपासून उडीदाचे संरक्षण होते.

Agriculture Advisory
Crop Advisory : खरीप पीक सल्ला

भुईमूग

पक्वतेची अवस्था

भुईमुगा पिकाचा पाला पिवळा दिसू लागल्यावर आणि शेंगाचे टरफल टणक बनून आतील बाजूने काळसर दिसू लागताच काढणी करावी. काढणीनंतर मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणुक करावी.

ऊस

वाढीची अवस्था

सहा ते आठ आठवड्यांच्या आडसाली को- ८६०३२ या वाणाकरीता (५००:२००:२०० किलो नत्र, स्फुरद व पालाश) शिफारशीत खते मात्रेपैकी ४० टक्के नत्र खताची (४३४ किलो युरिया प्रति हेक्टरी) दुसरी मात्रा द्यावी.

इतर जातींसाठी (४००:१७०:१७० किलो नत्र स्फुरद व पालाश) शिफारशीत खते मात्रेपैकी ४० टक्के नत्र खताची (३४७ किलो युरिया प्रति हेक्टरी) दुसरी मात्रा द्यावी.

खतमात्रा देताना सहा किलो युरियासाठी एक किलो निंबोळी पेंडची भुकटी चोळून द्यावी.

Agriculture Advisory
Crop Advisory : कृषी सल्ला (राहुरी विभाग)

कापूस

फुलोरा ते बोंड वाढीची अवस्था

जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी आंतरमशागतीची कामे आणि तण नियंत्रणासाठी कोळपणी, खुरपणी किंवा तणनाशकाचा वापर करावा.

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव समजण्यासाठी हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. मावा, तुडतुडे इत्यादी रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा अझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर पाणी प्रमाणे हवामान कोरडे असताना फवारणी करावी.

कांदा

लागवडीची अवस्था

रांगडा हंगामासाठी ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात कांद्याचे बी पेरून रोपे तयार करून घ्यावी. त्यांनी पुनर्लागवड ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी.

एक एकर कांदा लागवडीसाठी दोन गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. त्यासाठी दोन ते तीन किलो बी पुरेसे होते.

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणांस कार्बेन्डाझिम २ ग्रॅम हे बुरशीनाशक चोळावे. पेरणीपूर्वी २०० किलो शेणखतासोबत ५०० ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरिडी वापरून जमिनीत मिसळावे.

०२४२६ -२४३२३९

(प्रमुख, कृषिविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com