
Sangali News: शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेल्या निधीवर डल्ला मारून कोट्यवधी रुपयांचा अपहारप्रकरणी जिल्हा बॅँकेतील सात कर्मचार्यानां सेवेतून बडतर्फे करण्यात आले. सात कर्मचाऱ्यांनी मिळून विविध शाखांमध्ये २ कोटी ११ लाख ६० हजार रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. अपहारप्रकरणी अजून १८ कर्मचाऱ्यांची खातेअंतर्गत चौकशी सुरु आहे.
जिल्हा बँकेने बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांत इंद्रजित विठ्ठल वाघमारे (शाखा बसर्गी), योगेश सुरेश वजरीनकर, प्रमोद सुरेश कुंभार (शाखा मार्केट यार्ड तासगाव), बाळासो नारायण सावंत (पलूस), प्रतीक गुलाब पवार, मच्छिंद्रगड म्हारगुडे व दिगंबर पोपट शिंदे (शाखा नेलकरंजी) या कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे.
नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणांसाठी शासनाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना भरपाई, अनुदान स्वरूपात मदत दिली जाते. जिल्हा बॅँकेत गेल्या आठ ते दहा वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांची मदतीचे कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे. या रकमेत बॅँकेच्या काही शाखांमध्ये कर्मचाऱ्यांनीच अपहार केल्याच्या घटना गेल्या वर्षभरात सातत्याने उघडकीस आल्या आहेत.
हा अपहारही चार ते पाच वर्षापूर्वी झाला आहे. मात्र बॅँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी बॅँकेच्या सर्वच शाखांची अंतर्गत तपासणी मोहीम सुरु केल्याने हे घोटाळे उघडकीस आले आहेत.
जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये शासकीय मदत, अनुदान व देणे व्याज यामध्ये पाच कोटी २२ लाख रुपयांचा अपहार आतापर्यंत उघडकीस आला आहे. बँकेने संबंधित कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत २ कोटी ९० लाख रुपये वसुल केले आहेत. तसेच शासकीय अपहाराची सर्व रक्कम बँकेने शासनास परत केली आहे.
शिवाय अपहार करणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यातील काहींवर फौजदारी दाखल केली आहे. या सर्वच घोटाळेबाज कर्मचाऱ्यांची खातेतंर्गत चौकशी सुरु आहे. या चौकशीचा अंतिम अहवाल आल्यानंतर त्यांच्या बडतर्फीची कारवाई होणार आहे. सात कर्मचाऱ्यांचा सदरचा अहवाल बँकेस प्राप्त झाला असून त्यात या कर्मचाऱ्यांचा दोषी ठरवण्यात आले आहे. या सात कर्मचाऱ्यांना बँकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
सरकार, नाबार्डकडून कारवाईचे कौतुक
जिल्हा बँकेत शासन अनुदान व बँकेच्या देणे व्याजात कोट्यवधी रुपयांचा अपहार उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी अधिवेशनातही चौकशीची मागणी झाली. त्यानुसार सहकार विभागाने चौकशीचे आदेश दिले.
मात्र जिल्हा बँकेने त्यापूर्वीच घोटाळेबाज कर्मचाऱ्याविरोधात कडक कारवाईचे पाऊल उचलले. सर्वच घोटाळेबाजांना निलंबित केले. काहींवर फौजदारी दाखल केली तसेच बडतर्फीची कारवाईही केली. या कारवाईबाबत सहकार विभाग, नाबार्ड व चौकशी अधिकाऱ्यांनीही कौतुक केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.