Vasantdada Sugar institute  Agrowon
ॲग्रो विशेष

Vasantdada Sugar Institute : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटबरोबर कोकण कृषी विद्यापीठाचा करार

Latest Agriculture Research : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी, पुणे यांच्यामध्ये संशोधन, शिक्षण आणि विस्तार याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

राजेश कळंबटे

Ratnagiri News : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी, पुणे यांच्यामध्ये संशोधन, शिक्षण आणि विस्तार याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

या करारामुळे कृषीविद्या विभाग, कृषी रसायनशास्त्र विभाग, वनस्पतिशास्त्र विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना वसंतदादा इन्स्टिट्यूट संस्थेमधील विविध सोईसुविधांचा विद्यार्थी संशोधनासाठी फायदा घेता येणार आहे.

विद्यापीठाच्या कुलगुरू परिषद दालनात कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी, पुणेचे महासंचालक, डॉ. संभाजी कडूपाटील, प्रमुख शास्त्रज्ञ तथा पीक उत्पादन विभागाचे प्रमुख डॉ. ए. डी. कडलग, डॉ. सुनील दळवी, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, संचालक, विस्तार शिक्षण डॉ. प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डॉ. संजय तोरणे यांनी सामंजस्य करारामधील विविध घटकांवर सविस्तर चर्चा केली. डॉ. प्रशांत बोडके यांनी सामंजस्य करारामधील आत्तापर्यंत झालेल्या संशोधनाची माहिती दिली.

डॉ. ए. डी. कडलग आणि डॉ. सुनील दळवी यांनी आतापर्यंत झालेल्या संशोधनाचे सादरीकरण केले. आतापर्यंत या संस्थेद्वारे ४ संशोधनपर प्रकल्प राबविण्यात आले असून त्यामधून आलेल्या निष्कर्षावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी समाधान व्यक्त केले.

कोकणामधील जास्तीत जास्त लागवडीयोग्य पडीक जमीन ऊस या पिकाअंतर्गत आणण्यासाठी त्याचबरोबर जमिनीची सुपीकता आणि दर्जा टिकवून ठेवण्यासाठी या संशोधनाचा उपयोग शेतकऱ्यांना उसाची शेती करण्यास नक्कीच होईल, अशी आशा व्यक्त केली. मागील दोन वर्षे विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे ऊस संशोधन केंद्र तसेच कृषी विद्या विभाग, दापोली येथे विविध संशोधन प्रयोग देखील घेण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT