NCP Crisis : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला अजित पवारांची दांडी

Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादीतील फूटीनंतर अनेक कार्यक्रमांमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकमेकांसमोर येणं टाळले. त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी बैठकीला शरद पवार उपस्थित होते. परंतु अजित पवारांनी गैरहजेरी लावली.
Vasantdada Sugar institute
Vasantdada Sugar institute Agrowon

Vasantdada Sugar Institute Meeting : पुण्यात आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. तर कार्यकारी मंडळाचे सदस्य या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता होती. परंतु राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शरद पवार यांच्या समोर येण्याचे टाळत आहेत. त्याचा प्रत्यय आज पुन्हा आला. या बैठकीला अजित पवार यांनी दांडी मारली.

Vasantdada Sugar institute
NCP Crisis राष्ट्रवादी कुणाची ? निवडणूक आयोगासमोर 6 ऑक्टोबरला सुनावणी

शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक होते. आज कार्यकारी मंडळाची पुण्यातील मांजरी येथे ही बैठक झाली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित राहण्याची शक्यता होती. परंतु अजित पवार दौंडला गेल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील या बैठकीला उपस्थित होते.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे अजित पवार आणि शरद पवारांसाठी बॅनर झळकवले आहेत. लहान तोंडी घेतो मोठा घास, महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमिलनाची आस, असा मजकूर या बॅनर्सवर लिहिण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com