VSI In Nagpur : ‘व्हीएसआय’च्या नागपूर केंद्राचे कामकाज ऑगस्टपासून

विदर्भात ऊस लागवड क्षेत्र वाढत असतानाच या पिकातील व्यवस्थापन आणि संशोधनाला चालना मिळावी, यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपकेंद्र स्थापन करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे.
Sharada Pawar
Sharada PawarAgrowon

VSI In Nagpur विदर्भात ऊस लागवड (Sugarcane Cultivation) क्षेत्र वाढत असतानाच या पिकातील व्यवस्थापन आणि संशोधनाला चालना मिळावी, यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (Vasantdada Sugar Institute) उपकेंद्र स्थापन करण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे.

गोपाळपूर भागात तब्बल २०० एकरांवर त्याची उभारणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७२ एकर जागेची खरेदी करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात या क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे.

पारंपरिक पिकांऐवजी ऊस पीक आर्थिक संपन्नता देणारे आहे. याच कारणामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या भागात ऊस लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सद्यःस्थितीत नागपूर विभागात तीन कारखान्यांचे व्यवस्थापन त्यांच्याद्वारे होते. तर २५ हजार एकरांची लागवड आहे.

Sharada Pawar
Sugarcane Farming : विदर्भात ऊस शेतीसाठी व्हिएसआय करणार शेतकऱ्यांना मदत

मात्र या पिकाचे व्यवस्थापन तांत्रिक पद्धतीने होत नसल्याने उत्पादकता कमी आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ऊस संशोधन केंद्र तारसा येथे आहे. परंतु या केंद्राच्या नावे एकही उपलब्धी नाही. त्यामुळे गडकरी यांनी ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे ‘व्हीएसआय’चे उपकेंद्र उभारावे, अशी मागणी केली. त्यास श्री. पवार यांनी मान्यता दिली.

Sharada Pawar
VSI Awards : ‘व्हीएसआय’चे पुरस्कार जाहीर

सध्या उपलब्ध जमिनीच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. मोजणी आणि कंपाउंड, नांगरट, प्लॉट पाडणे, पाइपलाइन, वॉटर टॅंक उभारणे अशी कामे पहिल्या टप्प्यात होतील. त्यानंतर ऑगस्टमध्ये लागवड करून पुढील वर्षी या भागातील शेतकऱ्यांना सुधारित जातीचे बेणे देण्याचे प्रस्तावित आहे.

या भागात येणारे वाण देत त्या माध्यमातून ऊस उत्पादकता कशी वाढवायची याविषयीचे तंत्रज्ञानही पुरविले जाईल. नागपुरातील या केंद्राचे प्रमुख म्हणून डी. एस. पवार यांची नियुक्‍ती केली आहे. दोन सहायकही येथे आहेत.

नागपूर परिसरातील ‘व्हीएसआय’ उपकेंद्रासाठी २०० एकर जमिनीची गरज असली, तरी पहिल्या टप्प्यात ७२ एकरांची उपलब्धता झाली आहे. ऑगस्टमध्ये या ठिकाणी लागवड करून पुढील वर्षी शेतकऱ्यांना सुधारित बेणे देण्याचे नियोजन आहे.
- शिवाजीराव देशमुख, प्रमुख, व्हीएसआय, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com