Bajari Agrowon
ॲग्रो विशेष

Bajari Sowing : बाजरीच्या आगाप पेरणीला सुरुवात

Millet Sowing : खानदेशात बाजरीची पेरणी मागील दोन वर्षे पाच ते पाच हजार २०० हेक्टरवर झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात आगाप बाजरीची पेरणी सुरू झाली आहे. यंदा तीनही जिल्ह्यांतील एकूण क्षेत्र सुमारे पाच ते साडेपाच हजार हेक्टरवर स्थिर राहील, असे संकेत आहेत. खानदेशात बाजरीची पेरणी मागील दोन वर्षे पाच ते पाच हजार २०० हेक्टरवर झाली आहे.

यंदादेखील पेरणी स्थिर राहील. कारण बाजरीचे दर टिकून आहेत. मागील दोन वर्षे सरासरी दर १८०० रुपये प्रतिक्विंटल, असा जागेवर मिळाला आहे. तसेच काही शेतकऱ्यांना २००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलचा दरही मिळाला आहे. एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन आणि कमी खर्च शिवाय बेवडसाठी चांगला उपयोग यासाठी खानदेशात केळी पट्ट्यातही बाजरीची पेरणी केली जाते.

तसेच धुळ्यातील शिंदखेडा, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, भडगाव या भागात उन्हाळ पिकांत बाजरीला अधिक पसंती असते. जळगाव जिल्ह्यातील पेरणी यंदा तीन ते अडीच ते तीन हजार हेक्टरवर जाईल. तर धुळ्यात सुमारे दीड हजार हेक्टरवर आणि नंदुरबारातही एक हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी अपेक्षित आहे.

खरिपातही खानदेशात सहा ते सात हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी केली जाते. रब्बीतही क्षेत्र पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक असते. जळगाव जिल्ह्यात केळी पिकासाठी बेवड म्हणून चोपडा, यावल भागातही बाजरी पीक असते. नंदुरबारमधील शहादा भागातही कापूस पीक काढल्यानंतर त्यात बाजरीची पेरणी केली जाते. चांगला चारा व धान्य यासाठी शेतकरी बाजरीला खानदेशात पसंती देतात.

पेरणीला सुरुवात

कमी कालावधीचे पीक म्हणूनही बाजरीची ओळख आहे. परंतु एप्रिलमध्ये बाजरीचे पीक घेऊन क्षेत्र रिकामे व्हावे यादृष्टीने शेतकऱ्यांचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी आगाप पेरणी केळीपट्ट्यात सुरू झाली आहे. काही शेतकऱ्यांनी कांदेबाग केळीची काढणी ९५ ते ९७ टक्के झाल्याने त्यात पूर्वमशागत उरकून पेरणी केली आहे.

एप्रिलमध्ये पीक हाती आल्यानंतर त्यात पूर्वमशागत केली जाईल. संबंधित क्षेत्र तापून सुपीकता कशी टिकून राहील, याचेही नियोजन शेतकरी करीत आहेत. बाजरी पिकात कमाल शेतकरी सिंचनासाठी ठिबकचा उपयोग करण्यावर भर देत आहे.

अनेक शेतकरी हलक्या जमिनीत गहू, हरभरा जोमात येत नसल्याने त्यात बाजरीची पेरणी करीत आहेत. पेरणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहे. कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती दिली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhan Parishad Election 2026: राज्यात पुन्हा निवडणुकीचा धुरळा, विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर

Solar Energy Project: अकोला परिमंडळातील ३३ हजार ३८० वीज ग्राहक बनले वीज निर्माते

School Education System: लाखो मुलांना शाळेबाहेर ढकलणारी व्यवस्था

Onion Rate : कांदा दरासाठी आमदार अंबादास दानवेंचं समृद्धी महामार्गावर आंदोलन; पोलिसांनी दानवेंना घेतलं ताब्यात

India Economic Crisis: आर्थिक आपत्तीचे इशारे आणि शांत मध्यमवर्ग

SCROLL FOR NEXT