Rabi Sowing : मराठवाड्यात ७ लाख हेक्टरवर अजूनही रब्बी पेरणी नाही

Rabi Season : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदा पावसाअभावी सर्वसाधारण क्षेत्रापैकी ७ लाख ३५ हजार ४८७ हेक्टर वर अजूनही पेरणी झाली नाही.
Rabi Sowing
Rabi Sowing Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदा पावसाअभावी सर्वसाधारण क्षेत्रापैकी ७ लाख ३५ हजार ४८७ हेक्टर वर अजूनही पेरणी झाली नाही. अलीकडच्या काही दिवसात पडलेल्या पावसामुळे रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात २१ लाख ५ हजार ११० हेक्टरवर रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र प्रस्तावित होते. या क्षेत्रापैकी १३ लाख ६९ हजार ६२३ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. पेरणी झालेल्या या क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजी, नगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यातील ३ लाख ६८ हजार ७६ हेक्टर क्षेत्रासह लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यातील १० लाख १ हजार ५४७ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

छत्रपती संभाजी नगर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण सात लाख ४१ हजार १८० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४९.६६ टक्के रब्बीची पेरणी झाली तर लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यात सर्वसाधारण १३ लाख ६३ हजार ९३० हेक्टर क्षेत्रापैकी ७३ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : परभणीत ६२.०५ टक्के, तर हिंगोलीत ५३.८१ टक्के रब्बी पेरा

ज्वारीची पेरणी कमीच

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख २ हजार १३८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ५८.८० टक्के म्हणजे १ लाख ७७ हजार ६५२ हेक्टरवरच ज्वारीची पेरणी झाली आहे. दुसरीकडे लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यात रब्बी ज्वारीच्या सर्वसाधारण ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख ३५ हजार २४४ हेक्टरवर, म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६३ टक्के क्षेत्रावरच रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे.

गव्हाची पेरणी नगण्यच

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यात गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५७ हजार ११६ हेक्टर असताना प्रत्यक्ष ३३ हजार १३५ हेक्टर म्हणजे केवळ २१ टक्के क्षेत्रावरच गव्हाची पेरणी झाली. दुसरीकडे लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यात गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५६ हजार ५१९ हेक्टर असताना प्रत्यक्षात ५३८२३ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ३४ टक्के क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : पावसामुळे रब्बी पेरण्या खोळंबल्या

८ लाख १९ हजार हेक्टरवर हरभरा

दरवर्षी मराठवाड्यात हरभऱ्याची पेरणी सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन होत असते. यंदा मात्र इतर पिकांप्रमाणेच हरभऱ्याची ही अपेक्षित पेरणी झाली नसल्याची स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण २ लाख ३६ हजार ८४१ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ४२ हजार ८५३ हेक्टरवर म्हणजे ६० टक्के क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.

जिल्हानिहाय झालेली रब्बी पेरणी (हेक्टरमध्ये)

जिल्हा पेरणी क्षेत्र

छत्रपती संभाजीनगर ५३ हजार ६१८

जालना ७४ हजार ६४०

बीड २ लाख ३९ हजार ८१८

लातूर ३ लाख २ हजार ३३४

धाराशिव २ लाख ४० हजार २०४

नांदेड १ लाख ९५ हजार ७८८

परभणी १लाख ६८ हजार ०३१

हिंगोली ९५ हजार १८९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com