Manoj Jarange-Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : सगेसोयरे कायद्यासाठी राज्यभर आज 'रास्ता रोको' आंदोलन: मनोज जरांगे

Rasta Roko Protest : सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे या मागणीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ठाम आहे. या मागणीवरून त्यांनी उपोषण सुरू केलं असून राज्यभर आज रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्य सरकारने मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन १० टक्के आरक्षण घोषित केले आहे. मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना हे आरक्षण मान्य नसून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. तसेच सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे लावून धरली आहे. याच मागणीसाठी आज शनिवार (२४ रोजी) राज्यभर विविध ठिकाणी ११ ते १ यावेळेतच रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

यादरम्यान जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना, फक्त सरकार एका व्यक्तीच्या बोलण्यामुळे अधिसूचनेची अंमलबजावणी करत नाही. त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच सध्याच्या या राजांमध्ये समाजाबद्दल दया किंवा माया दिसत नाही. सध्या राज्यात तीन तीन राजे आहेत. मात्र पूर्वी आपल्याकडे एकच राजा असायचा आणि तोच न्याय करायचा. पण आता न्यायासाठी आपल्याला लढावे लागणार आहे. कारण एवढं मोठे आंदोलन करूनही सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचेही जरांगे यांनी म्हटले आहे.

पुढे जरांगे म्हणाले, सरकारच्या याच दुर्लक्ष करण्यामुळे आता मराठा समाज आंदोलनासाठी तयार झाला आहे. आज राज्यात होणारा रास्ता रोको शांततेत पार पाडा. ११ ते १ यावेळेत जिथे जिथे शक्य आहे तिथे रास्ता रोको करा. पण १ वाजल्यानंतर आंदोलन करु नका, असे आवाहन त्यांनी समाजाला केले आहे.

उद्या रास्ता रोको नाही

यावेळी जरांगे म्हणाले, आज हा रास्ता रोको जिथे जिथे शक्य आहे तेथे करा. तोही ठरलेल्या वेळेत. उद्या रास्ता रोको ऐवजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक गाव आणि शहरात धरणे आंदोलन करा असे ही जरांगे यांनी म्हटले आहे.

जरांगे यांचे आवाहन

आजपासून राज्यातील विविध ठिकाणी सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन ११ ते १ यावेळेत करण्यात येणार आहे. यावेळी हे आंदोलन शांततेच करा. १ वाजल्यानंतर रास्ता रोको आंदोलन करु नका, असे आवाहन त्यांनी समाजाला केले आहे.

पोलीस ॲक्शन मोडवर

दरम्यान आजपासून राज्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून याच्याआधीच पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. तर मराठा समाजातील जिल्हानिहाय मराठा नेते आणि आंदोलकांना नोटिस काढण्यात आल्या आहेत.

कोल्हापूरात बंदी आदेश

मराठा आंदोलन मनोज जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर आज गाव ते शहर असा रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र याच्याआधीच पोलिसांनी जिल्हानिहाय मराठा नेते आणि आंदोलकांना नोटिसा काढल्या आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश लागू केले आहेत.

हा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी काढला असून तो सोमवार (२६ रोजी) सकाळी सात वाजल्यापासून १० मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू असेल. श्री. क्षेत्र जोतिबा डोंगर येथे रविवार (ता. २५) पासून खेटे सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमिवर हा आदेश लागू करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT