Maratha Reservation : २४ तारखेपासून राज्यभर रास्ता रोको आंदोलनाचा मनोज जरांगेंचा इशारा

Maratha Protest : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी 'सगेसोयरे'च्या अधिसूचनेच्या अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिवसांचा इशारा दिला आहे. जर या दोन दिवसात 'सगेसोयरे'वर निर्णय झाला नाही तर २४ तारखेपासून राज्यभर रास्ता रोको करण्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationAgrowon

Pune News :  राज्य सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधेयक मंजूर केले. यावेळी राज्य सरकारकडून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण घोषित केले. मात्र बुधवारी (२१ रोजी) मनोज जरांगे पाटील यांनी परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली. तसेच 'सगेसोयरे'च्या अधिसूचनेच्या अंमलबजावणी करण्यात यावी असे म्हणत सरकारला दोन दिवसांचा इशारा दिला आहे. तर असे नाही केले तर २४ तारखेपासून राज्यभर रास्ता रोको केला जाईल असे म्हणत त्यांनी मराठा आरक्षण लढ्याच्या आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली आहे

आंदोलन मागे न घेणार नाही

तसेच हा रास्ता रोको राज्यभर रोज सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत केला जाणार असून दुपारनंतर ४ ते ७ दरम्यान केला जाईल अशी घोषणा केली आहे. तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर कुणबी आणि मराठा एकच असून सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश काढा, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या यासह मराठा आंदोलकांवर सर्व गुन्हे मागे घ्या, अशी मागणी केली आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation : शेतकरी आंदोलन आणि मराठा आरक्षणावरून शरद पवार, संजय राऊत आणि नाना पटोले यांचा सरकारवर घणाघात

पोलिसांना निवेदन द्या

पुढे जरांगे म्हणाले, "सरकारने समाजाला १० टक्के आरक्षण देऊन घोर फसवणूक केली आहे. यासाठीच आता राज्यभरात आंदोलन करायचं आहे. याची सुरूवात रास्ता रोको आंदोलन करून करायची आहे. तसेच यासाठी गावागावांतून हे आंदोलन करताना पोलिसांना निवेदन द्या, त्यांनी परवानगी दिली तरी रास्ता रोको करायचे आहे. हे आंदोलन सकाळी करायचे असून ज्यांना शक्य नाही त्यांनी सायंकाळी करा. आंदोलन हे माझ्या स्वतःच्या हट्टासाठी नसून सरकारला जेरीस आणण्यासाठी असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.

ओबीसीतूनच आरक्षण 

मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या अशी प्रमुख  मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच जे नको तेच सरकार आमच्या पदरात देतंय असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांना अडचण नको

यावेळी जरांगे यांनी बारावीच्या परीक्षेचा उल्लेख करताना, विद्यार्थ्यांना अडचण होणार नाही याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांची जबाबदारी तुमच्यावर आहे. गरज पडली तर तुमच्या गाड्यांवर विद्यार्थ्यांना पेपरच्या स्थळी सोडून या. पण रास्ता रोको आंदोलन करा असे म्हटले आहे. 

नेत्यांच्या दारात जाऊ नका

यावेळी जरांगेंनी राज्यातील कोणत्याही राजकीय नेत्यांच्या दारात जाऊ नका. त्यांना ही आपल्या दारासमोर येऊ देऊ नका. ही लोक मोठी असून तुमच्या जीवावर दादागिरी करतात असेही ते म्हणालेत. 

Maratha Reservation
Maratha Reservation : '...ज्या ठिकाणी जाहिरात निघेल तिथे आरक्षण लागू' : फडणवीस 

निवडणूक घेऊ नये

मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक आयोगाने निवडणूक घेऊ नये अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी थेट आयोगालाच इशारा देताना, निवडणूक घेतली तर प्रचाराच्या गाड्या गोठ्यावर नेल्या जातील असेही म्हटले आहे.  

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या -

१) मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा

२) ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण द्या

३) सोयऱ्यांची अमलबजावणी करा

४) अंतरवाली सह, राज्यातील सर्व केसेस विना अट मागे घ्या

५) मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट स्वीकारा, यासाठी १८८१ चे गॅझेट, १९०१ ची जनगणना आणि बॉम्बे गॅझेटची मदत घ्या

जरांगे पाटील हेकेखोर 

दरम्यान किर्तनकार हभप अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. त्यांनी, जरांगे पाटील हेकेखोर असून त्यांनी मराठ्यांना उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे. तसेच जरांगे यांनी बंद खोलीत रात्री बैठका केल्या आहेत. त्यांनी लोकांची फसवणूक केली आणि आताही ते फसवणूक करत आहेत. ते काय बोलतात याचे त्यांना भान राहत नाही, असा आरोप बारस्कर यांनी केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com