Coriander Price Fell agrowon
ॲग्रो विशेष

Coriander Price Fell : मोठ्या अपेक्षेने कोथिंबीर केली अन् दर पडला, खचलेल्या तरूण शेतकऱ्याने उभ्या पिकात फिरवला रोटर

Kolhapur Farmers : कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कोथिंबिरीच्या उभ्या पिकावर नांगरट केली आहे.

sandeep Shirguppe

Coriander Rate : मागच्या काही दिवसांत कोथिंबिरीच्याा पेंडीला २५ रूपये असलेला भाव अचानक उतरल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. झालेल्या पावसाने बाजारात कोथिंबिरीची आवक चांगली झाल्याने काढणीचा आणि औषधाचा खर्चही निघत नसल्याची परिस्थीती आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कोथिंबिरीच्या उभ्या पिकावर नांगरट केली आहे.

शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील शेतकऱ्याने कोथिंबीरच्या प्लॉटवर रोटावेटर फिरवत संताप व्यक्त केला. पावसाळ्यात कोथिंबिरीला चांगला भाव मिळतो या आशेने शेतमजुरी करणारा अमोल बरगाले या अल्पभूधारक शेतकऱ्याने ४० हजार रुपये कर्ज काढून कोथिंबीरची पेरणी केली.

दरम्यान जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दर चांगला होता परंतु झालेल्या पावसाने आवक चांगली झाल्याने चार दिवसातच पेंडीचा दर २ रुपयांवर आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. हेरवाड येथील शेतकरी बरगाले यांनी मागच्यावर्षी भागाने शेती करत कोथिंबीरचे चांगले उत्पादन घेतले होते. यात त्यांचा वर मालकाचा चांगला फायदा झाला होता.

यावर त्यांनी आपल्या ३० गुंठे शेतीत ४० हजार रुपये कर्ज काढून कोथिंबीरचा पेरा घेतला. शहरात कोथिंबीरला २५ ते ३० रूपये पेंडी असा दर पोहोचला होता. बरगाले याची कोथिंबीर १० दिवसांपूर्वी काढणीला सुरवात झाली होती.

मात्र सध्या गेल्या चार दिवसापासून कोथिंबीरची आवक वाढल्याने दर अगदी खालच्या थराला गेल्याने शेतकऱ्यांना कोथिंबीर शेताच्या बाहेर आणणे सुद्धा परवडत नाही. पेंडीला ३० रुपये असणारा दर २ रुपये दर झाल्याने शेतकरी बरगाले यांनी आपल्या ३० गुंठे कोथिंबीर क्षेत्रावर थेट नांगर फिरवला.

दरम्यान शिरोळ तालुका हा भाजी पाल्याचा तालुका म्हणून ओळखला जातो या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्याने नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. बरगालेंनी कोथिंबीर पिकावर नांगर लावताना संताप व्यक्त केला यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT