Kolhapur Rain : पंचगंगा नदी पात्राबाहेर; ५१ बंधारे पाण्याखाली, अतिवृष्टीचा इशारा

Panchaganga River Water : राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगा नदीची पाणी पातळी ३२.१ इंच अशी होती. इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फुटांवर आहे.
Kolhapur Rain
Kolhapur RainAgrowon
Published on
Updated on

Heavy Rainfall in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांत झालेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदी पात्राबाहेर गेली. राधानगरी काळम्मावाडी, गगनबावड्यासह घाटमाथ्यावर होत असलेल्या पावसाने धरण पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे.

तर पाटगाव येथे एका दिवसात २२० मिमी पाऊस झाला असून, येथे ढगफुटी सदृश स्थिती उद्‍भवली होती. जिल्ह्यातील पाच लघु प्रकल्प पूर्णक्षमतेने भरले आहेत तर राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगा नदीची पाणी पातळी ३२.१ इंच अशी होती. इशारा पातळी ३९ फूट तर धोका पातळी ४३ फुटांवर आहे.

जिल्ह्यातील राधानगरी धरणात ३.९७ टीएमसी पाणीसाठा आहे. आज (ता. ०९) सकाळी ७ च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १ हजार ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी. वारणा नदीवरील चिंचोली. भोगावती नदीवरील शिंरगाव, हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कासारी नदीवरील यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली व बाजारभोगाव.

घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. हिरण्यकेशी नदीवरील साळगांव व निलजी. ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकर, न्हावेली, कोवाड व उमगाव.

दुधगंगा नदीवरील दत्तवाड व सिध्दनेर्ली. तुळशी नदीवरील बीड. धामणी नदीवरील सुळे, पनोरे, आंबर्डे व गवशी. कुंभी नदीवरील कळे व शेनवडे. वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी व म्हसवे असे ५१ बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा टीएमसीमध्ये

राधानगरी ३.९७, तुळशी १.७५, वारणा १७.२९, दूधगंगा ८.६६, कासारी १.२५, कडवी १.६९, कुंभी १.१४, पाटगाव २.३७, चिकोत्रा ०.५२, चित्री १.०६, जंगमहट्टी ०.९७, घटप्रभा १.५६, जांबरे ०.८२, आंबेआहोळ १.००, सर्फनाला ०.२७ व कोदे लघु प्रकल्प ०.२१ इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे (फुटात)

राजाराम ३२.११, सुर्वे ३१.७, रुई ६१.६, इचलकरंजी ५७.६, तेरवाड ४९.६, शिरोळ ४०.६, नृसिंहवाडी ३७, राजापूर २७.१ फूट तर नजीकच्या सांगली १० व अंकली १३.१० अशी आहे.

Kolhapur Rain
Soybean Crop Kolhapur : अस्मानी अन् सुलतानीच्या भीतीनं शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाकडे फिरवली पाठ!

पुणे वेधशाळेने जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, यामुळे प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत होती. मात्र, आज पहिल्यांदाच नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून, पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे.

जिल्ह्यातील पावसाची स्थिती

चंदगड हेरेजवळील मोटनवाडी येथे रस्त्याकडेला भूस्खलन

वेतवडे पुलावर पाणी आल्याने मणदूर मार्गे वाहतूक चालू

राधानगरी तालुक्यातील मोहडे गावात दरड कोसळून घराचे नुकसान

शाहुवाडी तालुक्यातील मौजे काटे येथे कासारी नदीचे पाणी पुलावर आल्याने करंजफेण ते अणुस्कुरा मार्ग बंद

चंदगड येथे हेरे पुलावर ताम्रपर्णी नदीचे पाणी आल्याने वाहतूक बंद

कोल्हापूर शहरात पाच ठिकाणी झाडे पडली

लघुप्रकल्प भरले

गगनबावडा तालुक्यातील वेसरफ, कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले. वेसरफमधून १२५, तर कोदे प्रकल्पातून ४०० क्सुसेक पाणी सोडण्यात आले. शाहूवाडी तालुक्यातील भंडारवाडी, बुरमबाळ, इजोली, बर्की, वाकोली, येळवण जुगाई, आयरेवाडी, गावडी हे लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. राधानगरी तालुक्यातील असणे तलावही पूर्णक्षमतेने भरला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com