Shetkari Melava  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Technology : आधुनिक तंत्रज्ञानासह जोडधंद्याचा अंगीकार करा

Modern Agriculture Technology : कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र महत्त्वाचे आहे. ट्रॅक्टर, ड्रोन आदी आधुनिक तंत्रज्ञानासह जोडधंद्याचा अंगीकार शेतकऱ्यांनी केला पाहिजे.

Team Agrowon

Beed News : कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र महत्त्वाचे आहे. ट्रॅक्टर, ड्रोन आदी आधुनिक तंत्रज्ञानासह जोडधंद्याचा अंगीकार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. यामध्ये कृषी विज्ञान केंद्राची भूमिका महत्त्वाची आहे.

विद्यापीठाच्या बिजोत्पादन कार्यक्रमात शेतकरी व कृषी विज्ञान केंद्र यांना सहभागी करू. जिल्ह्याच्या विकासासाठी विद्यापीठ पूर्ण क्षमतेने काम करील, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

दीनदयाळ शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई व केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विशेष कापूस प्रकल्प’ अंतर्गत ‘शेतकरी मेळावा’ कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आला.

मेळाव्याचे उद्घाटक म्हणून कुलगुरू डॉ. इंद्र मणी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दीनदयाल शोध संस्थान बीडचे प्रकल्प प्रमुख डॉ. उपेंद्र कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, दादा लाड, कीर्ती देशपांडे, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूरचे मुख्य समन्वयक व प्रमुख (पिके) डॉ. अर्जुन तायडे, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र वरिष्ठ मृदा शास्त्रज्ञ डॉ. अंगामुथू मनीकंदन, प्राचार्य डॉ. प्रल्हाद जायभाये, वरिष्ठ शास्त्रज्ञ व केव्हीके प्रमुख डॉ. वसंत देशमुख, सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. दीप्ती पाटगावकर यांची उपस्थिती होती.

कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेल्या ‘शेतकरी यशोगाथा’ पुस्तिकेचे, ‘कापूस सघन लागवड’ माहितीपत्रक व ‘तूर उत्पादन तंत्रज्ञान’ घडीपत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कृषी क्षेत्रातील विविध घटकांमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून उल्लेखनीय कार्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील दहा शेतकऱ्यांना ‘भारतरत्न नानाजी देशमुख शेतकरी गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

श्री. मुंदडा म्हणाले, की रेशीम लागवड मोठ्या प्रमाणात वाढली असून विद्यापीठाच्या अंतर्गत अन्नतंत्र व रेशीम महाविद्यालय अंबाजोगाई येथे सुरू करावे अशी मागणी त्यांनी कुलगुरूंना केली. श्रीरंग (दादा) लाड यांनी कापूस पिकातील गळफांदी छाटणी, फळफांदी जोपासना तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. जायभाये म्हणाले, शेतीसाठी पाण्याची गरज २५ टक्क्यांनी वाढली आहे. डॉ. तायडे म्हणाले, जिल्ह्यातील हलक्या जमिनीवर अतिसघन कापूस लागवड करून १० क्विंटल उत्पादन घ्यावे. डॉ. उपेंद्र कुलकर्णी म्हणाले, केंद्राच्या विविध योजनाच्या माध्यमातून समाजातील अंतिम घटकापर्यंत पोहचण्याचे काम कृषी विज्ञान केंद्र करीत आहे.

याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र, जन शिक्षण संस्था, खाजगी क्षेत्रातील कापूस बियाणे कंपन्या, ट्रॅक्टर, अवजारे-यंत्र तसेच केंद्राच्या कार्यक्षेत्रातील विविध प्रक्रियादार व सेंद्रिय निविष्ठा उत्पादन करणारे शेतकरी यासह एकूण वीस प्रदर्शनी दालन उभा केले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन केंद्राचे कृषिविद्या शास्त्रज्ञ कृष्णा कर्डिले तर आभार कृषी अभियंता प्रमोद रेणापुरकर यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT