Agriculture Technology : मशागतीसाठी दुचाकीच्या जुगाडातून शोधला स्वस्त पर्याय

Technology of Agri : गरज ही शोधाची जननी असते असे म्हणतात. याच विचारातून हिरापूर (ता. अंजनगावसूर्जी, अमरावती) येथील प्रवीण मते यांनी मशागतीकरिता कमी खर्चाचा पर्याय म्हणून दुचाकीवरील यंत्रणा विकसित केली आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी हायड्रोलिक, रिव्हर्स गिअरची सुविधाही त्यावर आहे.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon

विनोद इंगोले

Development of Two-Wheeled Systems : अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी तालुक्‍याचा हिरापूर परिसर सातपुडा पर्वतरांगांनजीक आहे. या भागात पारंपरिक पिकाच्या जोडीला शेतकरी संत्रा लागवडीवरही भर देतात. त्यामुळेच या भागातील अर्थकारणदेखील समृद्ध होण्यास हातभार लागला आहे. व्यवसायिक शेतीचा आदर्श जपत काही शेतकऱ्यांनी पोल्ट्रीसारख्या पूरक व्यवसायावरही भर दिला आहे.

हिरापूर (ता. अंजनगावसुर्जी, अमरावती) येथील प्रवीण मते यांची अडीच एकर शेती आहे. या संपूर्ण क्षेत्रात संत्रा लागवड आहे. सिंचनसाठी बोअरवेलचा पर्याय आहे. संत्रा बागेत मशागत करताना प्रवीणरावांना काही अडचणी येत होत्या. छोट्या ट्रॅक्‍टर खऱेदीचा विचार केला तर त्यावर मोठा खर्च होणार हे त्यांच्या लक्षात आले.

त्यामुळेच कमी खर्चाचा काही तरी जुगाड करावा विचार त्यांच्या डोक्‍यात सतत घोंघावू लागला. त्यातूनच घरच्या दुचाकीमध्ये काही बदल करून तिचा आंतरमशागतीच्या कामांसाठी वापर करता येईल का? या संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात केली. गाव परिसरातील एका गॅरेज चालविणाऱ्या मित्राची यासाठी मदत घेतली. आणि मशागतीच्या कामांसाठी सुमारे ३० हजार रुपयांचा खर्च करत दुचाकीवरील यंत्रणा विकसित केली.

Agriculture Technology
Agriculture Technology : भातकापणी तंत्र, त्यातील यांत्रिकीकरण

जुन्या गाडीवर बसविली यंत्रणा :

प्रवीण यांच्याकडे वापरातील एक जुनी दुचाकी होती. दुचाकी खूप जुनी झाल्याने ती विक्रीसाठी काढली असता तिला केवळ तीन हजार रुपयांचा दर मिळत होता. त्यामुळे याच दुचाकीचा वापर जुगाडकामी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवातीला हा प्रयोग करताना ‘‘इंजिन उलसूकच (लहान) आहे, ओढते का बे?’’ अशा प्रकारचे टोमणे त्यांना ऐकावे लागले. मात्र त्यांनी हार न मानता या प्रयोगावर काम करण्याचा निश्‍चय केला.

अंजनगाव येथील एका कारागिराकडून दुचाकीवर सयंत्र जोडण्यासाठीची यंत्रणा बसविण्याकरीता आवश्‍यक त्या सुधारणा करून घेतल्या. दुचाकीची क्षमता ही अवघी १०० सीसी क्षमतेची होती. परिणामी, त्यातून मशागतीचे काम अपेक्षित होत नव्हते. एका अर्थाने इंजिनला अवजार ओढण्यास जास्त ताकद खर्ची करावी लागत होती.

त्यामुळे एक जुनी राजदूत सात हजार रुपयांत खरेदी करून त्यावर ही यंत्रणा बसविण्यात आली. त्यानंतरच्या काळात १५ हजार रुपये खर्च करून पुन्हा १५० सीसी क्षमतेची पल्सर ही दुचाकी खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी केला. सध्या पल्सर आणि बुलेट अशा दोन्ही दुचाकींच्या माध्यमातून शेती मशागतीची कामे अपेक्षितरीत्या करता येत असल्याचे, प्रवीण सांगतात.

Agriculture Technology
Agriculture Technology : अभियंता युवकाने तयार केली वैशिष्ट्यपूर्ण फवारणी यंत्रे

अभ्यासपूर्ण केले बदल :

- दुचाकी रस्त्याने चालविताना तिचे इंजिन गरम होते. मात्र रस्त्याने चालताना त्याला हवा लागते आणि त्याचे तापमान नियंत्रित राखले जाते. शेतात दोन्ही बाजूंनी पीक असल्याने दुचाकी मशागतीसाठी चालविताना इंजिनला हवा लागत नाही. परिणामी, ते गरम होऊन दुचाकी बंद पडण्याची भीती राहते. त्यामुळे इंजिनच्या दोन्ही बाजूंना थंड हवा लागण्यासाठी पंखे बसविले आहेत. या माध्यमातून इंजिन थंड होण्यास मदत होते.

- हायड्रोलिक प्रणालीसाठी ऑइलचा वापर न करता त्याऐवजी गरज भासल्यास ग्रीस (ऑइल) वापरतात.
- शेतातील माती ओली असल्यास दुचाकीचे टायर जमिनीत फसण्याची किंवा चालविताना घसरण्याची शक्‍यता होती. ही बाब लक्षात घेऊन दुचाकीला वापरल्या जाणाऱ्या टायरच्या आकारानुसार गट्टू टायरची निवड बसविणे गरजेचे होते. त्यासाठी मध्य प्रदेश येथील आटनेरमधून ट्रॅक्टरसाठी वापरलेले जाणारे छोटे गट्टू टायर आणून ते मागील दोन्ही बाजूंस लावण्यात आले.

या शेतीकामांसाठी वापर :

या दुचाकीच्या माध्यमातून सरी पाडणे, वखरणी, डवरणी अशी आंतरमशागतीची कामे केली जातात. तसेच संत्रा झाडांवर फवारणी करण्यासाठी त्यावर कॉम्प्रेसर बसविण्याची देखील सोय करण्यात आली आहे. तसेच २०० लिटर क्षमतेची पाणी टाकी बांधण्याची देखील सोय करण्यात आली आहे. कोरोना काळात सॅनेटायझर फवारणीसाठी याचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे फवारणीचे कामही सहज होते.

- प्रवीण मते, ९३७३२३९७६८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com