Shivaji University  Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Studies : ‘मास्टर ऑफ रुरल स्टडीज’साठी शिवाजी विद्यापीठात प्रवेश सुरू

Shivaji University : ग्रामीण भागांच्या विकासाशी संबंधित क्षेत्रांच्या उद्दिष्ट प्राप्तीवर लक्ष केंद्रित करतो. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची संरचना तयार केली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : येथील शिवाजी विद्यापीठातील यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट अंतर्गत असणारा ‘मास्टर ऑफ रुरल स्टडीज’ (एम.आर. एस.) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन अभ्यासक्रम समन्वयिका डॉ. कविता वड्राळे यांनी केले आहे.

ग्रामीण भागांच्या विकासाशी संबंधित क्षेत्रांच्या उद्दिष्ट प्राप्तीवर लक्ष केंद्रित करतो. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची संरचना तयार केली आहे. हा अभ्यासक्रम ग्रामीण भागांच्या विकासाशी संबंधित क्षेत्रांच्या उद्दिष्ट प्राप्तीवर लक्ष केंद्रित करतो. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची संरचना तयार केली आहे.

त्यासाठी अभ्यासक्रमामध्ये उद्योजकता, कृषी, कृषी-प्रक्रिया, ग्रामीण उद्योग, उद्योजकता विकास, अर्थशास्त्र, सांख्यिकी, नैसर्गिक संसाधने, पर्यावरण, विपणन, वित्त, सामाजिक सुधारणा, मानवी संसाधन विकास, नवोपक्रम व स्टार्टअप, समुदाय विकास, ग्रामीण विकास कार्यक्रम व योजना, सहकार, माहिती-तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय व्यापार, पर्यटन, व्यक्तिमत्त्व विकास व कौशल्य आदी घटकांचा समावेश केला आहे.

शिवाय या अभ्यासक्रमामध्ये ग्रामीण विकासाच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करणारे बहुविद्याशाखीय ज्ञान आणि कौशल्ये समाविष्ट केली आहेत. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ग्रामीण विकासाची वास्तविकता अनुभवण्यासाठी इंटर्नशिप, क्षेत्र अभ्यास आणि प्रकल्प अहवाल यासारख्या साधनांचा वापर केला जातो.

ग्रामीण अभ्यासक्रम हा ग्रामीण भागातील सर्व घटकांच्या विकासाशी संबंधित क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक सुलभ संधी उपलब्ध करून देतो. सुशिक्षित तरुणांनी स्थानिक भागात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक संसाधनाचा वापर लघू आणि मध्यम उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाते.

अभ्यासक्रमातील असलेले घटक, प्रकल्प, अंतर्गत प्रशिक्षण कौशल्य आणि संशोधन प्रबंध यामुळे युवा उद्योजक निर्मितीसाठी सकारात्मक प्रोत्साहन मिळते. स्वयंरोजगारशिवाय ग्रामीण भागातील विविध समस्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी संशोधनाचा अवलंब केला जातो.

यामुळे सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी आवश्यक धोरण निर्मिती व अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांना चालना मिळते. ग्रामीण विकासासाठी तरुणांनी शासकीय पातळीवरून आपले योगदान देण्यासाठी मास्टर ऑफ रुरल स्टडीज या अभ्यासक्रमाची रचना ही स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT