Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : प्रशासकीयदृष्ट्या झीरो पेंडन्सीमध्ये नाशिक विभाग अव्वलस्थानी

Nashik Division : राज्याच्या कृषी विभागामध्ये कृषी सहायक हा सर्वांत मोठा संवर्ग आहे.

Team Agrowon

Nashik News : कृषी विभागामध्ये प्रशासकीयदृष्ट्या झीरो पेंडन्सीमध्ये नाशिक विभाग अव्वल स्थानी असल्याने, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, विभागाचे प्रशासकीय अधिकारी गजानन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

राज्याच्या कृषी विभागामध्ये कृषी सहायक हा सर्वांत मोठा संवर्ग आहे. कृषी विभागाच्या आठ संभागापैकी, नाशिक संभागामध्ये कृषी सहायक संवर्गाच्या प्रशासकीयदृष्ट्या असणाऱ्या विविध प्रश्‍नांची वेळेत सोडवणूक केल्याने राज्यात नाशिक विभाग अव्वलस्थानी असल्याने, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना नाशिक विभाग यांच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष संदीप केवटे व राज्य सरचिटणीस सोमनाथ बाचकर यांच्या हस्ते नाशिक विभागाचे विभागीय कृषी सह संचालक मोहन वाघ, विभागाचे प्रशासकीय कामकाज सांभाळणारे प्रशासकीय अधिकारी गजानन पाटील, सहायक प्रशासन अधिकारी हनुमंत सूर्यवंशी, वरिष्ठ लिपिक गौरव पाटील, सुरेंद्र पवार, कुलकर्णी, लिपिक दीपाली जगताप यांचा सन्मान करण्यात आला.

प्रशासन आणि कृषी सहायक संघटना यांच्यात समन्वय ठेवला जात आहे. याच पद्धतीने कार्यप्रणालीचा अवलंब राज्यातील उर्वरित सात विभागात झाल्यास, प्रशासन व कर्मचारी यांच्यामध्ये चांगले वातावरण निर्माण होईल व यामुळे विभागाचे कामकाज सकारात्मक वातावरणात पार पडण्यास मदत होईल, अशी भावना संघटनेचे राज्य सरचिटणीस सोमनाथ बाचकर यांनी व्यक्त केली.

तसेच दरवर्षी कृषी सहायक संवर्गाच्या प्रशासकीयदृष्ट्या विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीत अव्वल राहणारे विभागीय कृषी सहसंचालक व त्या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान दरवर्षी संघटनेच्या वतीने केला जाणार असल्याचे सूतोवाच करण्यात आला. राज्य महिला प्रतिनिधी स्वाती झावरे यांनी प्रास्ताविक केले.

तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिक विभागाच्या वतीने उपाध्यक्ष शरद सुरळकर, विभागीय सचिव नीलेश भदाणे, राज्य कार्यकारिणी सदस्य जयकीर्तिमान पाटील, प्रमोद पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष हरिभाऊ गावित, कार्याध्यक्ष भास्कर आव्हाड, कोशाध्यक्ष तुषार गवळी यांनी परिश्रम घेतले विभागीय कृषी सहसंचालक यांनी आलेल्या सर्व संघटनांच्या पदाधिकारी यांचा सत्कार केला.

...या कामांवर प्रामुख्याने असतो भर

कृषी सहायक संवर्गाची वैद्यकीय बिलावर आठ दिवसांत शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही, सामान्य भविष्य निर्वाह निधी परतावा आठ दिवसांत परतावा, गेल्या तीन वर्षांपासून नसलेली ज्येष्ठता सूची जिल्हा स्तरावर कॅम्प घेऊन ती अंतिम, कालबद्ध पदोन्नतीचा लाभ, उत्कृष्ट कामाबद्दल क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सत्कार, नव्या रुजू कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jowar Procurement: सात-बारावर पीकपेरा नसतानाही ५३८४ क्विंटल ज्वारीची खरेदी

Farmer Support: पशुपालनाला आता ‘कृषी’च्या धर्तीवर सवलतीत वीजपुरवठा

Agriculture Department: कृषी विभागातील अकार्यकारी पदे घोषित

Sugarcane Price: उसाला ३३०० रुपये दर निश्चित

Commercial Farming: आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात रुजविला व्यावसायिक शेती पॅटर्न

SCROLL FOR NEXT